उपसंपादकासाठी सूचना : कानिफनाथ याच्याही शेतात पाळी घाल. होता. - काही ठिकाणी नको तेथे पूर्णविराम पडले आहेत. काढले तरी पुन्हा येतात. करेक्शन करता येत नाही. तपासणे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:21 IST2021-06-09T04:21:48+5:302021-06-09T04:21:48+5:30
परभणी : शेतीच्या वादातून मुलाने वडिलांना काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना ४ जून रोजी दुपारी ३.३० ...

उपसंपादकासाठी सूचना : कानिफनाथ याच्याही शेतात पाळी घाल. होता. - काही ठिकाणी नको तेथे पूर्णविराम पडले आहेत. काढले तरी पुन्हा येतात. करेक्शन करता येत नाही. तपासणे.
परभणी : शेतीच्या वादातून मुलाने वडिलांना काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना ४ जून रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास जिंतूर तालुक्यातील पाचेगाव शिवारात घडली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचेगाव येथील विठ्ठल दादाराव ससे यांनी त्यांच्या दीपक व कानिफनाथ या दोन मुलांना प्रत्येकी ४ एकर जमीन वाटून दिली होती. ४ मे रोजी ते शेतात गेले असता त्यांचा मोठा मुलगा दीपक हा त्याच्या आणि कानिफनाथ याच्याही शेतात पाळी घाल. होता. या वेळी विठ्ठल ससे यांनी दीपकला तू तुझ्या हिश्शाच्या शेतीत पाळी घाल. कानिफनाथच्या शेतात पाळी घाल. नको, असे म्हटले. त्यावर दीपक ससे याने वडील विठ्ठल ससे यांना शिवीगाळ करीत काठीने मारहाण केली. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिली. या वेळी त्याची आई व इतरांनी येऊन सोडवासोडव केली. याबाबत विठ्ठल ससे यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात ५ मे रोजी तक्रार दिली. त्यावरून आरोपी दीपक ससे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.