सात लाभार्थ्यांवर हायड्रोसीलची यशस्वी शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:29 IST2021-02-06T04:29:17+5:302021-02-06T04:29:17+5:30
परभणी : हायड्रोसीलमुक्त महाराष्ट्र या अभियानांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयात ७ लाभार्थ्यांवर अंडवृद्धी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. आरोग्यसेवेचे सहाय्यक ...

सात लाभार्थ्यांवर हायड्रोसीलची यशस्वी शस्त्रक्रिया
परभणी : हायड्रोसीलमुक्त महाराष्ट्र या अभियानांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयात ७ लाभार्थ्यांवर अंडवृद्धी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली.
आरोग्यसेवेचे सहाय्यक सहसंचालक डॉ. नंदकुमार देशमुख यांच्या सूचनेनुसार जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा हिवताप कार्यालयाच्यावतीने हायड्रोसीलमुक्त महाराष्ट्र हे अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत हायड्रोसीलग्रस्त ३६ लाभार्थ्यांचा शोध घेण्यात आला. त्यात १६ जणांची शस्त्रक्रियेपूर्वीची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ७ लाभार्थ्यांवर अंडवृध्दी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश डाके, भूलतज्ज्ञ डॉ. दुर्गादास पांडे, डॉ. बालाजी मुंडे, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. बी. टी. धूतमल यांच्या सहकार्याने डॉ. अशोक बन, डॉ. शाहबाज देशमुख यांनी या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्या. त्यासाठी अधिसेविका मीना देशमुख, परिसेविका जयश्री वाणी, फारुखी यांचे सहकार्य लाभले. यशस्वीतेसाठी शरद कदम, माणिक कासापुरी, जाफर पटेल, एस. एम. चाटे, मुकादम आदींनी प्रयत्न केले. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात हायड्रोसीलग्रस्त रुग्णांचा शोध घेतला जात आहे. या मोहिमेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केली जात असून, रुग्णांनी जिल्हा हिवताप विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.