दहावीची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:18 AM2021-05-18T04:18:39+5:302021-05-18T04:18:39+5:30

परभणी : कोरोनाच्या संसर्गामुळे राज्य शासनाने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असला, तरी परीक्षा शुल्क परत करण्यासंदर्भात अद्याप ...

Students waiting for examination fee due to cancellation of 10th standard examination | दहावीची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काची प्रतीक्षा

दहावीची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काची प्रतीक्षा

Next

परभणी : कोरोनाच्या संसर्गामुळे राज्य शासनाने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असला, तरी परीक्षा शुल्क परत करण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे विद्यार्थी निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.

दरवर्षी दहावी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्कासह अर्ज दाखल करून घेतला जातो. हे शुल्क दहावी बोर्डाकडे जमा केल जाते. मात्र, या वर्षी ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कोरोनाचा संसर्ग सुरू झाला आणि शासनाने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. परीक्षा होणार नसल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत करणे अपेक्षित आहे. मात्र, त्या संदर्भात अद्यापही कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काची प्रतीक्षा लागली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती बिकट आहे. रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा वेळी दहावीची परीक्षा रद्द झाल्याने परीक्षा शुल्क परत करणे गरजेचे आहे.

श्रीकांत बहिरट, विद्यार्थी

दहावीची परीक्षा रद्द झाल्याने परीक्षेसाठी बोर्डाकडे जमा केलेले शुल्कही परत करणे आवश्यक आहे. सध्या कोरोना संकटामुळे पैशांची नितांत आवश्यक असून, या संदर्भात निर्णय अपेक्षित आहे.

गणेश बनसोडे, विद्यार्थी

शिक्षणाधिकारी म्हणतात...

विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्यासंदर्भात बोर्डाकडून कोणतेही आदेश आलेले नाहीत. शिक्षण विभागाच्या वरिष्ठ पातळीवरून या संदर्भात ज्याप्रमाणे सूचना प्राप्त होतील. त्यानुसार, पुढील कार्यवाही केली जाईल.

- विठ्ठल भुसारे, प्रभारी शिक्षणाधिकारी, परभणी

Web Title: Students waiting for examination fee due to cancellation of 10th standard examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.