शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकावर ताटकळत बसणे थांबले; प्रत्येक बसचे कळणार लाईव्ह लोकेशन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:22 IST

परभणी येथील विभागीय नियंत्रक कार्यालयाअंतर्गत हिंगोली आणि परभणी या दोन जिल्ह्यांतील ७ आगारांचा कारभार पाहिला जातो. मागील सव्वा वर्षापासून ...

परभणी येथील विभागीय नियंत्रक कार्यालयाअंतर्गत हिंगोली आणि परभणी या दोन जिल्ह्यांतील ७ आगारांचा कारभार पाहिला जातो. मागील सव्वा वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारंवार जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला. मात्र आता कोरोनाचा विळखा कमी होत असल्याने एसटी महामंडळाची सेवा दुसऱ्या लॉकडाऊननंतर पूर्वपदावर आली आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी मागील काही दिवसात एसटी महामंडळाने शिवशाही बस आपल्या ताफ्यात दाखल करून प्रवाशांना आरामदायी प्रवास करण्यासाठीची सोय उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर प्रवास करताना प्रवासी कंटाळू नयेत, यासाठी सर्वच बसेसमध्ये वाय-फायची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे प्रवासी खासगी वाहतूक सोडून एसटी महामंडळाच्या ‘लाल परी’ने प्रवास करण्यास पसंती देऊ लागले, परिणामी महामंडळाच्या उत्पन्नामध्ये मोठी वाढ झाली होती. त्यातच आता प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रत्येक गाडीची लाईव्ह वेळ कळावी, यासाठी एसटी महामंडळ प्रशासनाकडून व्हेईकल ट्रेकिंग सिस्टिम अमलात आणली असून प्रवाशांना बसस्थानकावर ताटकळत बसण्यापेक्षा बसची लाईव्ह वेळ घरबसल्या किंवा बस स्थानकांमध्ये कळणार आहे. सद्यस्थितीत परभणी विभागीय नियंत्रण कार्यालयांतर्गत येणाऱ्या ७ आगारांतील ४४४ बसेसपैकी ४२० बसेसमध्ये ही प्रणाली बसविण्यात आली असून वरिष्ठांच्या आदेशानंतर ही प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे आता बसस्थानकावर प्रवाशांचे ताटकळत बसणे थांबले असून प्रत्येक बसचे लाईव्ह लोकेशन कळणार आहे.

बसस्थानकात लागणार मोठे स्क्रीन

एसटी महामंडळ प्रशासनाच्यावतीने व्हेईकल ट्रेकिंग सिस्टिमचा वापर सुरू केल्यानंतर जिल्ह्यातील चार व विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत येणाऱ्या सात बसस्थानकांमध्ये मोठे स्क्रीन बसविण्यात येणार आहेत. या स्क्रीनच्या माध्यमातून प्रत्येक गाडी सध्या कुठल्या ठिकाणी आहे, बसस्थानकात पोहोचण्यास किती वेळ लागणार आहे, याची लाईव्ह माहिती या स्क्रीनद्वारे प्रवाशांना मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचून प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे.

गाडीचा स्पीड, लोकेशनही कळणार

परभणी येथील विभागीय नियंत्रक कार्यालयाअंतर्गत असलेल्या ४४४ बसेसपैकी ४२० बसेसमध्ये ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे आता या बसेसचा स्पीड तसेच लोकेशन या प्रणालीद्वारे कळणार आहे. त्यामुळे प्रवाशांना बसची वाट पाहत बसण्याची आता गरज नाही. प्रवाशांसाठी व्हिटीस प्रणाली महत्त्वाची असणार आहे.

चालकांच्या निष्काळजीपणाला बसणार चाप

एसटी महामंडळ प्रशासनाच्यावतीने व्हेईकल ट्रेकिंग सिस्टिम अमलात आणल्यानंतर एखाद्या बसच्या चालक वा वाहकाकडून विनाकारण लेट होत असेल किंवा या कर्मचाऱ्यांकडून कोठे टाईमपास केला जात असेल, तर त्याची माहिती लगेच बसस्थानकातील प्रशासनास कळणार आहे. त्यामुळे गाड्यांना वेळ पाळणेही सोपे होणार आहे.