शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:13 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी प्रशासनाला २१ जून रोजी निवेदन सादर केले होते. मात्र, यातील मागण्या पूर्ण ...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी प्रशासनाला २१ जून रोजी निवेदन सादर केले होते. मात्र, यातील मागण्या पूर्ण न झाल्याने शुक्रवारी सकाळी ११ वाजता वसमतरोडवरील काळीकमान येथे पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. यामध्ये पीक कर्जवाटपाची गती वाढविण्यात यावी, महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना देण्यात यावा, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम शासनाने द्यावी, जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी एफआरपीची पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ वितरित करावी, गंगाखेड शुगर लिमिटेड माखणी या कारखान्याने शेतकऱ्यांची ऊस बिलाची रक्कम परत करावी, शासकीय दूध दरवाढ करावी, तसेच झरी फिडरवर झालेला जास्तीचा भार कमी करण्यासाठी बोरी व परिसरातील इतर लाइन दुसऱ्या फिडरला जोडाव्यात, अशी मागणी रास्ता रोको दरम्यान स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. आंदोलनात किशोर ढगे, गजानन तुरे, भास्कर खटिंग, केशव अरमळ, राजाभाऊ लोंढे, दिगंबर पवार, शेख जाफर, रामेश्वर आवरगंड, उद्धव जवंजाळ, मधुकर चोपडे, अजय खटिंग, राम दुधाटे, गजानन खटिंग, काशीनाथ शिंदे, माऊली शिंदे, रामप्रसाद गमे यांचा सहभाग होता. प्रशासनाने रास्ता रोको आंदोलनस्थळी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.