जिल्ह्यातील सर्व आस्थापना सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:15 IST2021-06-02T04:15:14+5:302021-06-02T04:15:14+5:30
परभणी : फेब्रुवारी महिन्यापासून बंद असलेली जिल्ह्यातील सर्व दुकाने तात्काळ सुरू करावीत, अशी मागणी आ. डॉ. राहुल पाटील यांनी ...

जिल्ह्यातील सर्व आस्थापना सुरू करा
परभणी : फेब्रुवारी महिन्यापासून बंद असलेली जिल्ह्यातील सर्व दुकाने तात्काळ सुरू करावीत, अशी मागणी आ. डॉ. राहुल पाटील यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे केली आहे.
१ जून रोजी आ. डॉ. राहुल पाटील यांनी शिष्टमंडळासह मुगळीकर यांची भेट घेतली. कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात कमी झाला आहे. इतर जिल्ह्यांतही संसर्ग कमी झाल्याने तेथे सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. परभणी जिल्ह्यात दोन महिन्यांपासून दुकाने बंद असल्याने व्यापारी आर्थिक संकटात असून, तात्काळ दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली.
यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, संजय गाडगे, रवींद्र पतंगे, अनिल डहाळे, नवनीत पाचपोर, मारुती तिथे, रेडिमेड असोसिएशनचे विकास वट्टमवार, माऊली शिंदे, कपडा असोसिएशनचे अश्रफ सेठ साया, मनोज माटरा, गेही ठाकूर, ईलियास मारफानी, फरहान घाँची, स्वप्नील वट्टमवार, गोविंद शर्मा आदी उपस्थित होते.