जिंतूरजवळ पुलावरून बस कोसळली, ४२ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2024 10:04 AM2024-03-20T10:04:18+5:302024-03-20T10:08:15+5:30

जखमींना पुढील उपचारासाठी परभणी येथे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

st bus falls from bridge near jintur 15 passengers injured | जिंतूरजवळ पुलावरून बस कोसळली, ४२ प्रवासी जखमी

जिंतूरजवळ पुलावरून बस कोसळली, ४२ प्रवासी जखमी

जिंतूर: जिंतूर-सोलापूर बस आज सकाळी सव्वा आठच्या सुमारास अकोली गावाजवळील पुलावरून खाली कोसळली. यात बसमधील ४२ प्रवासी जखमी झाले. तर यापैकी दहा ते बारा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. 

जिंतूर आगारातून जिंतूर-सोलापूर ही बस ( क्रमांक एमएच १४ बीटी २१७०) सकाळी आठ वाजेच्या सुमारास निघाली. शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर जाताच अकोली पुलाजवळील वळणावर बस पुलावरून खाली कोसळली. बस कोसळण्याचा आवाजाने आजूबाजूच्या हॉटेलमधील कामगार, शेतकरी, वाहनधारकांनी तात्काळ जखमींना बाहेर काढले. तर सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात यांच्यासह इतरांनी रुग्णवाहिकेतून जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जवळपास २५ जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

अपघात एवढा भीषण होता की गाडीचे इंजन बाजूला जाऊन पडले. तर गाडीचे टायर वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले होते. पुलाचा डाव्या बाजूचा कठडा पूर्णपणे उध्वस्त झाला. माहिती मिळताच पोलीस,आरोग्य विभागाचे कर्मचारी, सामाजिक कार्यकर्त्यांनी अपघातस्थळी धाव घेतली.

अपघाताचे कारण गुलदस्त्यात
अपघात झाल्यानंतर एसटी बसचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. त्याने अपघात होत असताना बसमधून उडी मारली असावी असा अंदाज आहे. प्रत्यक्षदर्शीच्या मते चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा. यामुळे नेमका अपघात कशामुळे हे आता चालकच सांगू शकेल.

जखमी प्रवाशांची नावे अशी :
मनकर्णा भराडे, संगीता शिवाजी कांगणे, कदिर खान बक्तरी खान, ज्ञानेश्वर मोहिते, निलाबाई इप्पर, निकिता मस्के, साफीया मोहम्मद फुरखान, शेख मेहराज शेख नसीर, शरद पाटील, नितेश देशमुख ,सदाशिव डोईफोडे ,नामदेव पुंड ,रंजना जाधव ,शेख गफार शेख सत्तार ,काशीबाई बन्सी रोकडे, धनश्री दत्तात्रेय रोकडे, अब्दुल अजीज,अ. रजाक, सय्यद काशीद, सत्यभामा संतोष मोहारे, पूजा संतोष मोहारे ,यमुना रोहिदास मस्के, समर्थ राजकुमार भांबळे, राजकुमार संभाजी भांबळे ,पल्लवी राजकुमार भांबळे ,विष्णू शिवाजी भांबळे, सुनीता विष्णू भांबळे ,रुद्र राजकुमार भांबळे ,ज्ञानेश्वर रमेश धर्मे ,जगदीश रमेश धर्मे ,सविता रमेश धर्मे, रमेश हरिभाऊ धर्मे ,छाया राजेश डहाळे ,गीता गजानन डहाळे, प्रियंका राजेश डहाळे ,प्रभाकर विश्वनाथ सानप, मंदाकिनी प्रभाकर सानप, निर्मला नारायण सानप ,नारायण विश्वनाथ सानप ,यांचा जखमीमध्ये समावेश आहे.

Web Title: st bus falls from bridge near jintur 15 passengers injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.