स्नेहल अंभोरे प्रथम, ऋतुजा बडवई द्वितीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:15 IST2021-05-30T04:15:40+5:302021-05-30T04:15:40+5:30
कोरोना संसर्गामुळे दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासावर आधारित ...

स्नेहल अंभोरे प्रथम, ऋतुजा बडवई द्वितीय
कोरोना संसर्गामुळे दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासावर आधारित परीक्षा व्हावी, या उद्देशाने येथील श्री शिवाजी पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटने ऑनलाइन टॅलेंट सर्च परीक्षा २५ मे रोजी आयोजित केली होती. दहावी इयत्तेतील गणित, विज्ञान, इंग्रजी, बुद्धिमत्ता चाचणी या विषयांवर ७० प्रश्न या परीक्षेत विचारण्यात आले. परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात येथील गांधी विद्यालयाची विद्यार्थिनी स्नेहल अंभोरे प्रथम, तर अकोला येथील ऋतुजा बडवई हिने द्वितीय क्रमांक मिळविला. पंढरपूर येथील संजय घोडावत ऑलिम्पियाड स्कूलचा विद्यार्थी प्रथित संजय मेहता याने तृतीय क्रमांक मिळविला आहे. याव्यतिरिक्त दहावीतील प्रथम १२ विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून आर. एस. अग्रवाल यांचे पुस्तक वितरित करण्यात आले.
या परीक्षेत राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधून ११०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. संस्थेचे अध्यक्ष आ. प्रकाश सोळंके, सचिव आ. सतीश चव्हाण, स्थानिक नियामक मंडळाचे अध्यक्ष अनिल नखाते, सदस्य नारायण चौधरी, प्राचार्य शाहीद ठेकिया आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
परीक्षेच्या यशस्वीतेसाठी प्रवेश विभाग पथकाचे प्रमुख ज्ञानेश्वर तरवटे, रोहन तिवारी, सिद्धेश्वर जाधव, प्रदीप रणखांब, वर्षा जाधव, देवयानी पंचलवार, काजल थावरे, संजय पारिपिल्ले आदींनी प्रयत्न केले.