शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
2
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
3
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
4
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
5
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
6
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
7
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
8
PHOTOS : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना; पहिल्या बॅचमध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही
9
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
10
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
11
"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला
12
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
13
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
14
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
15
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
16
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
17
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
18
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
19
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
20
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी

सेलू पोलिस ठाण्याच्या भिंतीवरून उडी मारत सोनसाखळी चोराचे हातकडीसह पलायन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 2:06 PM

एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावल्या प्रकरणी सेलू पोलिसांच्या ताब्यात एक आरोपी अटकेत होता. आज पहाटे ५. 30 वाजे दरम्यान त्याला शौचास सोडल्यानंतर त्याने अंधाराचा फायदा घेत हातकडीसह संरक्षण भिंतीवरून उडी मारून पलायन केले.

ठळक मुद्देसोन्याचे गंठण हिसकावल्या प्रकरणी सेलू पोलिसांच्या ताब्यात होता आरोपी न्यायालयाने त्याला सहा दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती.शोधासाठी ४ पथके विविध दिशेने रवाना करण्यात आली आहेत.

सेलू ( परभणी ), दि. ६ : एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावल्या प्रकरणी सेलू पोलिसांच्या ताब्यात एक आरोपी अटकेत होता. आज पहाटे ५. 30 वाजे दरम्यान त्याला शौचास सोडल्यानंतर त्याने अंधाराचा फायदा घेत हातकडीसह संरक्षण भिंतीवरून उडी मारून पलायन केले. नारायण प्रकाश तिवार असे पलायन केलेल्या आरोपीचे नवा असून त्याच्या शोधासाठी ४ पथके विविध दिशेने रवाना करण्यात आली आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, रेल्वे स्टेशन परिसरात दसर्‍याच्या दिवशी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावणार्‍या नारायण प्रकाश तिवार ( रा.राजीव गांधी नगर,सेलू ) या अारोपीस नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी रंगेहात पकडले होते.अारोपीकडून हिसकावलेले गंठणही पोलिसांनी हस्तगत केले होते. या प्रकरणी त्यास पोलिसांनी अटक करून सेलू न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला सहा दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती.

आज पहाटे साडेपाचच्या सुमारास त्याला  शौचास जाण्यासाठी कोठडीतून बाहेर काढण्यात आले. यावेळी त्याने अंधाराचा फायदा घेत पोलिस कर्मचार्‍याच्या हाताला झटका देत हातकडीसह संरक्षण भिंतीवरून उडी मारून पलायन केले. आरोपीचा शोध घेण्यासाठी ४ पोलिस पथक विविध दिशेने रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, वाढत्या चोरीच्या घटना आणि आरोपीचे दूसर्‍यांदा पलायन या घटना पाहता सेलू पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.