- मारोती जुंबडे परभणी : शहरातील नवा मोंढा परिसरात चोरट्यांनी एकाच रात्रीत सहा कृषी दुकाने फोडून २ लाख १० हजार ५०० रुपयांची रोकड व कृषी साहित्य लंपास केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात सायंकाळी सुमारे सहा वाजता अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही चोरीची घटना मंगळवारी पहाटे तीन ते सहा वाजेच्या दरम्यान घडली.
चोरट्यांनी नवा मोंढा भागातील जय किसान कृषी केंद्र, त्रिमूर्ती ऍग्रो एजन्सी, ट्रेडिंग कंपनी, किरण ट्रेडिंग कंपनी, वरद ट्रेडर्स आणि श्री साई एजन्सी ही सहा दुकाने फोडली. दुकानांचे शटर उचकटून रोकड व कृषी साहित्य लंपास करण्यात आले.ही चोरीची घटना मंगळवारी पहाटे तीन ते सहा वाजेच्या दरम्यान घडली. चोरट्यांनी नवा मोंढा भागातील जय किसान कृषी केंद्र, त्रिमूर्ती ऍग्रो एजन्सी, मुकेर ट्रेडिंग कंपनी, किरण ट्रेडिंग कंपनी, वरद ट्रेडर्स आणि श्री साई एजन्सी ही सहा दुकाने फोडली. दुकानांचे शटर उचकटून रोकड व कृषी साहित्य लंपास करण्यात आले.
सकाळी व्यापारी दुकान उघडण्यासाठी आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व तपास सुरू केला आहे.
Web Summary : Thieves targeted Parbhani's Nawa Mondha, breaking into six agricultural shops overnight. They stole ₹2,10,500 in cash and agricultural supplies. Police are investigating the incident that occurred between 3 AM and 6 AM.
Web Summary : परभणी के नवा मोंढा में चोरों ने छह कृषि दुकानों में सेंध लगाई। उन्होंने ₹2,10,500 नकद और कृषि सामग्री चुराई। पुलिस सुबह 3 बजे से 6 बजे के बीच हुई घटना की जांच कर रही है।