पोखर्णीत श्री नृसिंह कृपा पनॉलचा दणदणीत विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:20 IST2021-01-19T04:20:17+5:302021-01-19T04:20:17+5:30

पोखर्णी (नृ) : परभणी तालुक्यातील पोखर्णी नृसिंह येथे झालेल्या निवडणुकीत श्री नृसिंहकृपा ग्रामविकास पॅनलचे ९ उमेदवार विजयी झाले असून, ...

Shri Nrusinha Kripa Panol's resounding victory in Pokharni | पोखर्णीत श्री नृसिंह कृपा पनॉलचा दणदणीत विजय

पोखर्णीत श्री नृसिंह कृपा पनॉलचा दणदणीत विजय

पोखर्णी (नृ) : परभणी तालुक्यातील पोखर्णी नृसिंह येथे झालेल्या निवडणुकीत श्री नृसिंहकृपा ग्रामविकास पॅनलचे ९ उमेदवार विजयी झाले असून, या पॅनलने ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले आहे.

श्री नृसिंह कृपा ग्रामविकास पॅनल व श्री लक्ष्मी नृसिंह ग्राम विकास पॅनलमध्ये सरळ लढत झाली. या निवडणुकीत श्री नृसिंह कृपा ग्रामविकास पॅनलचे प्रल्‍हाद मारोती भदर्गे, गयाबाई इंद्रोबा मडके, कौशल्याबाई ज्ञानोबा एडके, सुनिता सोपान वाघ, विठ्ठल ज्ञानोबा वाघ, राधा ज्ञानोबा वाघ, जयश्री अशोकराव वाघ, शेषराव रंगराव वाघ, मारोती बापुराव बाभुळकर हे ९ उमेदवार विजयी झाले. श्री लक्ष्मी नृसिंह ग्रामविकास पॅनलचे शशिकला शंकर आसेवार व रोहिणी राजेश पांचाळ हे उमेदवार विजयी झाले. शेषराव रंगराव वाघ, परमेश्वर वाघ, तुकाराम वाघ, माणिकराव पंडितराव वाघ, बाबुराव वाघ, गणेशराव वाघ, माणिकराव तातेराव वाघ, गंगाधर भुमरे, सुरेश मोते, बाबुराव बडे, काशिनाथ यादव, वचिस्ट वाघ, शेषराव बापुराब वाघ, बाबासाहेब तातेराव वाघ, नरहरी वाघ, किशन लष्कर, तुकाराम पवार, अशोक एडके, नरहरी एडके, बालासाहेब मडके, अशोक पुजारी, उत्तम बेले, हनुमान पवार, तुकाराम भदर्गे, किशन वाघ, श्रीनिवास बाभुळकर आदींनी श्री नृसिंह कृपा पॅनलचे नेतृत्व केले.

Web Title: Shri Nrusinha Kripa Panol's resounding victory in Pokharni