श्री भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:16 IST2021-05-16T04:16:30+5:302021-05-16T04:16:30+5:30

अध्यक्षस्थानी श्री परशुराम संस्कार सेवा संघाचे राज्य कार्याध्यक्ष विठूगुरू वझूरकर हे होते.तर प्रमुख पाहूणे म्हणूण वेशासं प्रभाकर नित्रूडकर गुरूजी, ...

Shri Bhagwan Parashuram Janmotsav in excitement | श्री भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात

श्री भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात

अध्यक्षस्थानी श्री परशुराम संस्कार सेवा संघाचे राज्य कार्याध्यक्ष विठूगुरू वझूरकर हे होते.तर प्रमुख पाहूणे म्हणूण वेशासं प्रभाकर नित्रूडकर गुरूजी, डाॅ.गणेश देशमुख, परशुराम संस्कार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकरगुरू गोळेगावकर, माजी सभापती सचिन देशमुख, शंकरराव जोशी, दिनेश नरवाडकर, ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज यांची उपस्थिती होती. यावेळी आरोग्य क्षेत्रात चांगली कामगिरी केल्याबद्दल नगरसेवक सचिन देशमुख यांना ''कोविड योद्धा'' म्हणूण तसेच परभणी शासकीय रूग्णालयात ऑक्सिजन गळती थांबवून अनेक रुग्णांचे प्राण वाचविणाऱ्या बायोमेडीकल इंजिनियर सुनिल कुलकर्णी यांचा ''समाज रक्षक'' पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पाथरी येथील डाॅ. राजेंद्र चौधरी, डाॅ.मंजुषा चौधरी, जोशी व ठोले, मंगरूळकर यांना परशुराम सेवा संघाची नवीन पदाची जबाबदारी देण्यात आली. विश्वंभर काठवटे यांनी सूत्रसंचालन केले. सुधाकर गोळेगावकर यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी मनोज धर्माधिकारी, सचिव नरेंद्र शुक्ल, वैभव असोलेकर, विकास तळणीकर, कार्याध्यक्ष सुप्रिया कुलकर्णी, रेणुका पाटील, पुष्पक वझूरकर, विशाल वझूरकर, कुलकर्णी, प्रशांत डाफणे, प्रकाशदेव केदारे, ओंकार गोळेगावकर आदींनी प्रयत्न केले. या वेळी वैष्णव पुरुषोत्तमराव देशमुख यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याची माहिती दिली.

Web Title: Shri Bhagwan Parashuram Janmotsav in excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.