परभणीत मारहाणीनंतर हवेत गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:14 IST2021-06-25T04:14:33+5:302021-06-25T04:14:33+5:30

येथील दर्गारोड भागात गुरुवारी दुपारी दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. या वादानंतर एक जण स्कूटीवर बसून जात असताना पारवा ...

Shooting in the air after the beating in Parbhani | परभणीत मारहाणीनंतर हवेत गोळीबार

परभणीत मारहाणीनंतर हवेत गोळीबार

येथील दर्गारोड भागात गुरुवारी दुपारी दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. या वादानंतर एक जण स्कूटीवर बसून जात असताना पारवा रोड भागात मुलाला स्कूटीचा धक्का लागण्याच्या कारणाने काही जणांनी स्कूटी चालकाला थांबविले. याच वेळी या स्कूटी चालकाने त्याच्या ताब्यातील बंदुकीतून हवेत गोळीबार केला. त्यातील एक गोळी याच ठिकाणी उभ्या असलेल्या कारला लागल्याने कारची काच फुटली आहे. दरम्यान या घटनेनंतर काही वेळाने कुर्बान अलीशाह नगर येथे चौघांनी तलवार आणि इतर धारदार शस्त्रांनी एका युवकावर हल्ला केला. हा हल्ला करुन आरोपी त्या ठिकाणाहून फरार झाले. या हल्ल्यात एक जण जखमी झाला आहे.दरम्यान या दोन्ही घटनांमुळे दर्गा रोड परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक जयंत मीना, सहायक पोलीस अधीक्षक अविनाशकुमार यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या दोन्ही घटनांमधील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाले आहेत. रात्री ८ वाजेपर्यंत कोतवाली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद झाला नव्हता. पोलिसांनीही अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे या घटनेतील आरोपींची नावे व घटनेचे नेमके कारण समजू शकले नाही.

Web Title: Shooting in the air after the beating in Parbhani