धक्कादायक ! कोरोनावर मात करून परतलेल्या वृद्धाची नैराश्यातून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 19:45 IST2021-05-08T19:45:00+5:302021-05-08T19:45:21+5:30

परभणी तालुक्यातील बोबडे टाकळी येथील सुभाष दत्तराव बोबडे यांना १६ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती.

Shocking! Depressed old man commits suicide after returning from Corona treatment | धक्कादायक ! कोरोनावर मात करून परतलेल्या वृद्धाची नैराश्यातून आत्महत्या

धक्कादायक ! कोरोनावर मात करून परतलेल्या वृद्धाची नैराश्यातून आत्महत्या

परभणी : कोरोनावर मात करून घरी परतलेल्या सुभाष दत्तराव बोबडे (६२) यांनी कोरोना आजाराला कंटाळून राहत्या घरी पत्र्याच्या आढ्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना परभणी तालुक्यातील बोबडे टाकळी येथे गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली आहे.

परभणी तालुक्यातील बोबडे टाकळी येथील सुभाष दत्तराव बोबडे यांना १६ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर ५ मे रोजी सुभाषराव बोबडे हे कोरोनातून मुक्त झाले. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सुभाष राव बोबडे हे रुग्णालयातून घरी परतल्यानंतर तणावात होते. अशातच त्यांनी गुरुवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या घराच्या पत्र्याच्या आढ्याला गळफास घेतला. 

त्यांचा मुलगा अविनाश बोबडे यांनी ग्रामीण पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक गणेश राहिरे, गीते, जमादार राजेश राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास जमादार राजेश राठोड हे करीत आहेत. सुभाष बोबडे यांनी कोरोना आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी सांगितली.

Web Title: Shocking! Depressed old man commits suicide after returning from Corona treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.