शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
7
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
8
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
9
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
10
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
11
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
12
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
13
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
14
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
15
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
16
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
17
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
18
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
19
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
20
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...

परभणीत शिवसेनेने महावितरण कार्यालयाला ठोकले टाळे, लेखी आश्वासनानंतरच घेतले आंदोलन मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2017 5:11 PM

शेतक-यांना कृषीपंपाच्या वीज जोडण्या देण्यात याव्यात, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने सकाळी महावितरणच्या मुख्य कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन करण्यात आले. तब्बल चार तास चालेल्या या आंदोलनाने  विभागाच्या अधिका-यांची चांगलीच गोची झाली.

ठळक मुद्देशिवसेनेचे खा.बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी ११ वाजता महावितरणसमोर आंदोलन सुरु करण्यात आले. महावितरणसमोर आंदोलन सुरु असल्याने कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक प्रारंभ तासभर ठप्प झाली होती. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापर्यंत चर्चा झाल्यानंतर महावितरणचे प्रकल्प संचालक दिनेशचंद्र साबू यांच्याशी चर्चा केल्यानंतर तोडगा निघाला. मागण्या मान्य केल्याचे अधीक्षक अभियंता कांबळे यांनी लेखी स्वरुपात खा.जाधव यांना दिले. त्यानंतर  खा. जाधव यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.

परभणी :  शेतक-यांना कृषीपंपाच्या वीज जोडण्या देण्यात याव्यात, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने सकाळी  महावितरणच्या मुख्य कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन करण्यात आले. तब्बल चार तास चालेल्या या आंदोलनाने  विभागाच्या अधिका-यांची चांगलीच गोची झाली. शेवटी मागण्या मान्य झाल्यासंदर्भात लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आले. 

शिवसेनेचे खा.बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी ११ वाजता महावितरणसमोर आंदोलन सुरु करण्यात आले. अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयामधील सर्व अधिकारी, कर्मचा-यांना बाहेर काढून खा.जाधव यांनी स्वत:च या कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारास कुलूप ठोकले. त्यानंतर महावितरणच्या अधिका-यांची धादंल उडाली. अधीक्षक अभियंता यशवंत कांबळे यांनी खा. जाधव यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, खा. जाधव यांनी जोपर्यंत मागण्या मान्य झाल्याचे लेखी आश्वासन मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला. 

महामार्ग झाला ठप्प महावितरणसमोर आंदोलन सुरु असल्याने कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक प्रारंभ तासभर ठप्प झाली होती. त्यामुळे दोन्ही बाजुंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. पोनि. अशोक घोरबांड यांनी खा.जाधव यांच्याशी चर्चा करुन एका बाजुने वाहतूक सुरु करावी, अशी विनंती केली. त्यानंतर जवळपास अर्धा तास वाहतूक सुरु झाली. परंतु, महावितरणकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याने शिवसैनिक संतापले. त्यानंतर पुन्हा रस्तारोको करण्यात आला. तसेच या रस्त्यावर तीन वेळा टायर जाळण्यात आले. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक काहीवेळ इतरत्र वळविण्याचा प्रयत्न झाला. परंतु, अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटला नाही. 

व्यवस्थापकीय संचालकाचा पुतळ्याचे केले दहन या दरम्यान अधीक्षक अभियंता कांबळे यांनी वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा केली. वरिष्ठ अधिका-यांनी खा.जाधव यांच्याशी संवाद साधून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. परंतु, ठोस आश्वासन मिळत नसल्याने त्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरीया यांच्याकडूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने शिवसैनिकांनी त्यांना प्रतिकात्मक पुतळा जाळला. परिस्थिती चिघळत असल्याने पोलिसांनी शिवसैनिकांना शांत केले. 

ऊर्जामंत्र्याच्या चर्चेनंतर निघाला तोडगा या दरम्यान, खा.जाधव यांनी महावितरणचे आॅपरेशन विभागाचे संचालक देशपांडे, मुख्य अभियंता अविनाश पाटोळे यांच्याशी चर्चा केली. तरीही तोडगा निघाला नाही. अखेर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापर्यंत चर्चा झाली. त्यानंतर महावितरणचे प्रकल्प संचालक दिनेशचंद्र साबू यांच्याशी चर्चा केल्यानंतर तोडगा निघाला. त्यामध्ये प्रलंबित असलेल्या ३ हजार कृषीपंपाच्या वीज जोडण्यापैकी १ हजार वीज जोडण्यांच्या कामांना दोन दिवसांत सुरुवात करण्यात येईल, डीपी जळाल्यानंतर शेतक-यांकडून ५ हजार ऐवजी २ हजार रुपये एवढी रक्कम घेतली जाईल, दोष असलेले विद्युत मीटर बदलून दिले जातील. तसेच त्रुटी आढळलेल्या वीज बिलात दुरुस्ती करुन दिल्या जाईल, मराठवाडा-विदर्भ पॅकेज अंतर्गत मंजूर झालेल्या कामांसाठीचा निधी टप्प्याटप्प्याने जिल्ह्याला वितरित केला जाईल. या मागण्या मान्य केल्याचे अधीक्षक अभियंता कांबळे यांनी लेखी स्वरुपात खा.जाधव यांना दिले. त्यानंतर  खा. जाधव यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. तब्बल चार तासानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख संजय कच्छवे, उपजिल्हाप्रमुख माणिक पोंढे, सदाशीव देशमुख, जि.प.सदस्य विष्णू मांडे, राम खराबे, प्रभाकर वाघीकर, सखुबाई लटपटे, अर्जून सामाले, मधुकर निरपणे, दशरथ भोसले, पंढरीनाथ घुले, रविंद्र धर्मे, विशाल कदम, संतोष एकलारे, संदीप भंडारी, बाळासाहेब निरस आदींची उपस्थिती होती. 

पोलीस अधीक्षकांच्या आगमनानंतर गोंधळतब्बल चार तास आंदोलन सुरु असल्याने महावितरणच्या अधिका-यांची गोची झाली असताना आंदोलनस्थळी प्रारंभी पोलीस उपाधीक्षक संजय परदेसी आले. त्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे दाखल झाले. त्यानंतर पोलीस अधीक्षक दिलीप झळके स्वत: ३ वाजेच्या सुमारास महावितरण कार्यालयात आले. त्यानंतर महावितरणच्या कार्यालयाचे कुलूप उघडण्याची सूचना केली. त्यामुळे कार्यालयाच्या बाजुला असलेले खा.जाधव यांनी कुलूप उघडण्यास मज्जाव करुन संकटात सापडलेल्या शेतकºयांसाठी हे आंदोलन आहे. त्यामुळे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत कुलूप उघडू दिले जाणार नाही, असे सांगून महावितरणच्या प्रवेशद्वाराकडे धाव घेतली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. शेवटी पोलीस अधीक्षक झळके हे ही शांत झाले. त्यानंतर काही वेळातच लेखी आश्वासन महावितरणच्या अधिका-यांनी खा. जाधव यांना दिले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणparabhaniपरभणी