निबंध स्पर्धेत शिवम खिस्ते प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:17 IST2021-03-06T04:17:01+5:302021-03-06T04:17:01+5:30
परभणी : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित निबंध स्पर्धेत शिवम खिस्ते हा प्रथम आला असून, ...

निबंध स्पर्धेत शिवम खिस्ते प्रथम
परभणी : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित निबंध स्पर्धेत शिवम खिस्ते हा प्रथम आला असून, संदेश वाघमारे याने द्वितीय क्रमांक मिळवला आहे. परभणी येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत ‘परभणी जिल्ह्यातील वाहतूकविषयक समस्या व उपाययोजना’ या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, त्यात शिवम खिस्ते याने प्रथम, संदेश वाघमारे याने द्वितीय आणि हिंदवी सातपुते हिने तृतीय क्रमांक मिळवला आहे. या स्पर्धकांना अनुक्रमे ३ हजार १, २ हजार १ आणि १ हजार १ रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. विजेत्या व उर्वरित स्पर्धकांना लवकरच स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नखाते यांनी दिली.