शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणारे शिवाजी महाराज हे पहिले राजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:32 IST2021-02-21T04:32:25+5:302021-02-21T04:32:25+5:30
पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात ...

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणारे शिवाजी महाराज हे पहिले राजे
पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा.डॉ.नागेश गवळी हे बोलत होते. अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल नखाते हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सेलू बाजार समिती मुख्य प्रशासक विनायक पावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल, पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण, माजी सभापती दादासाहेब टेंगसे, बाजार समीती उपसभापती एकनाथराव शिंदे, संचालक प्रभाकर शिंदे, चक्रधर उगले, नारायण आढाव, लहू घांडगे, विश्वांभर साळवे, एकनाथ सत्वधर, गोविंद हारकळ, नितिन शिंदे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक एकनाथ शिंदे यांनी केले, तर सूत्रसंचालन गोपाल आम्ले यांनी केले.