कोरोनाच्या संसर्गामुळे शिवमंदिरे बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:30 IST2021-03-13T04:30:56+5:302021-03-13T04:30:56+5:30

११ मार्च रोजी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवानिमित्त दरवर्षी शिव मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते. यावर्षी ...

Shiva temples closed due to corona infection | कोरोनाच्या संसर्गामुळे शिवमंदिरे बंदच

कोरोनाच्या संसर्गामुळे शिवमंदिरे बंदच

११ मार्च रोजी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवानिमित्त दरवर्षी शिव मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते. यावर्षी कोरोनाचा संसर्ग वाढल्याने मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. गुरुवारी शिवमंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. येथील पारदेश्वर मंदिर, बेलेश्वर महादेव मंदिर यासह इतर मंदिर परिसरात दिवसभर पोलीस बंदोबस्त तैनात होता. एकाही मंदिरात भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला नाही. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिर परिसर भाविकांविना ओस पडल्याचे दिसून आले. दरम्यान, अपर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी शहरातील शिव मंदिरांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. मंदिरात जाऊन दर्शन घेता आले नसले तरी भाविकांनी घरोघरी भगवान शिवशंकराची पूजा करून उपवास करीत महाशिवरात्री साजरी केली.

Web Title: Shiva temples closed due to corona infection