नारायण राणे यांच्याविरोधात शिवसेनेची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:23 IST2021-08-25T04:23:08+5:302021-08-25T04:23:08+5:30
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले असून, त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटत ...

नारायण राणे यांच्याविरोधात शिवसेनेची निदर्शने
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले असून, त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. परभणीत शिवसैनिकांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवित नारायण राणे यांचा निषेध नोंदविला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. नारायण राणे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
आ. डॉ. राहुल पाटील यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर, नंदू पाटील, विधानसभा संघटक माणिक पोंढे, रवी पतंगे, सदाशिव देशमुख, राहुल खटिंग, मकरंद कुलकर्णी, सखुबाई लटपटे, संजय गाडगे, चंदू शिंदे, नितीन कदम, रामप्रसाद रणेर, संजय सारणीकर, अमोल भालेराव, प्रदीप भालेराव, अंबिका डहाळे, अरविंद देशमुख, विशू डहाळे, बाळराजे तळेकर आदींसह कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होते.