शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

शिवसेना आमदार राहुल पाटील यांचे स्पष्टीकरण, मी मुंबईतच आहे, गुवाहाटीला गेलेलो नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 19:17 IST

आमदार राहुल पाटील सुरतमार्गे विमानाने गुवाहाटीला जाणार असून शिंदे गटात सामील होणार असल्याची अफवा पसरली होती.

परभणी: शिवसेनेला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आज मोठा धक्का बसला आहे. त्यातच परभणीचे आमदार राहुल पाटील नॉट रिचेबल असल्याची अफवा पसरल्याने ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या.मात्र, एक जीवन एक नेता, अशा भावना व्यक्त करणारे आ. राहुल पाटील यांनी मी मुंबईतच असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. 

महाराष्ट्राच्या राजकारणात मागील एक आठवड्यापासून राजकीय भूकंप आला आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेत उभी फुट पाडली आहे. मुंबई, ठाणे नंतर सेनेचा बालेकिल्ला असलेल्या मराठवाड्यातून तब्बल ९ आमदार शिंदे गटात गेले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील उदयसिंग राजपूत, परभणीचे राहुल पाटील, हिंगोलीतील संतोष बांगर आणि उस्मानाबादचे कैलास पाटील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम आहेत. दरम्यान, आज सायंकाळी आमदार राहुल पाटील यांचा फोन दोन दिवसांपासून नॉट रिचेबल असून ते गुवाहाटीला जाण्याच्या तयारीत असल्याची अफवा पसरली. पाटील सुरत मार्गे विमानाने गुवाहाटीला जाणार असून शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा सुरु झाली. यामुळे आज दुपारी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सेनेला आणखी एक धक्का बसल्याचे मानले जात होते. शिंदे गटात पाटील जाणार याची चर्चा सुरु असतानाचा आमदार राहुल पाटील यांनी मी मुंबईतच आहे.पक्षाची गद्दारी करणार नाही, अशी प्रतिक्रिया माध्यमांना लागलीच दिली. यामुळे पाटील बंडखोरांच्या गटात जाणार या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे.

ज्याने शिवसेना सोडली त्याला जनतेने सोडले...शिवसेनेच्या तिकिटावर जे निवडून आले त्यापैकी ज्यांनी सेना सोडली त्यांना जनतेनेच सोडून दिल्याचा आजवर जिल्ह्याचा इतिहास आहे. त्यामुळेच ‘परभणीकरांची रीतच न्यारी’ अशी म्हण राजकीय वर्तुळात चर्चेत येत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार धोक्यात आले आहे. आतापर्यंत राज्यात ५ वेळा शिवसेनेत फूट पडली आहे. असे असताना परभणीतही शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या नेत्यांनी सेना सोडून निवडणूक लढल्यानंतर मात्र राजकारणात यश मिळाले नसल्याचा इतिहास पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ