झुडपात लपविलेले दारूचे रसायन जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:18 IST2021-04-28T04:18:43+5:302021-04-28T04:18:43+5:30
जिल्ह्यात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. पोलिसांची नजर चुकवून दारूची अवैध विक्री करण्यासाठी आरोपी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरत ...

झुडपात लपविलेले दारूचे रसायन जप्त
जिल्ह्यात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. पोलिसांची नजर चुकवून दारूची अवैध विक्री करण्यासाठी आरोपी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरत आहेत. मानवत तालुक्यातील केकरजवळा येथे शेतशिवारातील एका काटेरी झुडपामध्ये हातभट्टी दारू बनविण्याचे ६०० लिटर रसायन लपवून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली. त्याआधारे २७ एप्रिल रोजी सकाळी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार, विश्वास खोले व पथकातील कर्मचाऱ्यांनी छापा टाकला. मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी दारूचे रसायन आढळले. हे रसायन पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी नानू सुंदर पवार या संशयित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक माने तपास करीत आहेत.