परभणीत लांबविली सव्वालाखाची बॅग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 01:00 IST2017-12-12T00:59:38+5:302017-12-12T01:00:48+5:30
बसमध्ये चढत असताना एका प्रवाशाची बॅग लांबविल्याची घटना ११ डिसेंबर रोजी पावणेतीन वाजेच्या सुमारास परभणी बसस्थानकामध्ये घडली. या बॅगमध्ये रोख रक्कमेसह १ लाख २९ हजार रुपयांचा ऐवज होता.

परभणीत लांबविली सव्वालाखाची बॅग
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : बसमध्ये चढत असताना एका प्रवाशाची बॅग लांबविल्याची घटना ११ डिसेंबर रोजी पावणेतीन वाजेच्या सुमारास परभणी बसस्थानकामध्ये घडली. या बॅगमध्ये रोख रक्कमेसह १ लाख २९ हजार रुपयांचा ऐवज होता.
मानवत येथील अर्चना सूर्यकांत माळवदे ह्या ११ डिसेंबर रोजी परभणी येथून मानवत येथे जाण्यासाठी नातेवाईकासोबत बसस्थानकावर आल्या होत्या. दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास अक्कलकोट-पाथरी ही बस आल्यानंतर त्या बसमध्ये चढत होत्या. यावेळी चोरट्यांनी बॅग लांबविल्याचे त्यांची लक्षात आले. अर्चना माळवदे यांच्या बॅगमध्ये साडेचार तोळ्याचे सोन्याचे गंठण, रोख ५ हजार रुपये व तीन हजार रुपयांचा मोबाईल होता. ही बॅग चोरल्याने अर्चना माळवदे यांना झटकाच बसला. त्यांनी थेट कोतवाली पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी अर्चना माळवदे यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार कुलाने, जमादार आईतवार तपास करीत आहेत.