सोमवारपासुन होणार सरपंचाची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:02 IST2021-02-05T06:02:49+5:302021-02-05T06:02:49+5:30

तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर १८ जानेवारी रोजी निकाल जाहीर झाला. या निकालानंतर गुडघ्याला ...

Sarpanch will be elected from Monday | सोमवारपासुन होणार सरपंचाची निवड

सोमवारपासुन होणार सरपंचाची निवड

तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर १८ जानेवारी रोजी निकाल जाहीर झाला. या निकालानंतर गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या, सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्या गाव पुढाऱ्यांचे लक्ष सरपंच निवडीच्या कार्यक्रमाकडे लागले होते. प्रशासनाने ३ फेब्रुवारी रोजी सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर केला असून, चार दिवस निवडीचा कार्यक्रम सुरू राहणार आहे. यामध्ये ८ फेब्रुवारी रोजी रामपुरी बुद्रुक, सावरगाव खुर्द, उक्कलगाव, वझूर खुर्द, मानवत रोड, रूढी, गोगलगाव/ आंबेगाव, वांगी/ कुंभारी, जंगमवाडी, टाकळी नि, नरळद, ९ फेब्रुवारी रोजी केकरजवळा, भोसा, शेवडी/ दुधनगाव, हत्तरवाडी, १० फेब्रुवारी रोजी किन्होळा बु., हमदापूर, रामेटाकळी, कोल्हा, खरबा, पोहंडूळ, नागरजवळा, पिंपळा, मंगरूळ पा प, खडकवाडी, हटकरवाडी, ११ फेब्रुवारी रोजी लोहरा, थारा, पार्टी टाकळी, तर १२ फेब्रुवारी रोजी ताडबोरगाव, करंजी, सारंगपूर, मंगरूळ, बुद्रुक/साखरेवाडी, कोथळा, मांडेवडगाव, सावंगी मगर, बोन्दरवाडी, सोमठाणा/ आटोळा/ राजुरा, सावळी, इटाळी या ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचांची निवड होणार आहे.

Web Title: Sarpanch will be elected from Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.