संजीवनी सोमासे प्रथम, प्रणाली पाटील द्वितीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:23 IST2021-02-26T04:23:52+5:302021-02-26T04:23:52+5:30
परभणी : मराठा सेवा संघ प्रणीत परभणी जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ...

संजीवनी सोमासे प्रथम, प्रणाली पाटील द्वितीय
परभणी : मराठा सेवा संघ प्रणीत परभणी जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत संजीवनी सोमासे हिने प्रथम तर प्रणाली पाटील हिने द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
या स्पर्धेचे नुकतेच बक्षीस वितरण करण्यात आले. वसमत रोडवरील जिजाऊ मंदिर येथे पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे कोषाध्यक्ष सुभाष जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष ढगे, प्रा.डॉ.रमेश शिंदे, अमित सोळंके, आयोजक संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी मोहिते, महानगराध्यक्ष गजानन जोगदंड, जिल्हा सचिव साहेब शिंदे, अमोल आवकाळे, प्रीतम पैठणे यांची उपस्थिती होती.
या स्पर्धेत ९४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यात संजीवनी शिवकुमार सोमासे (औरंगाबाद) हिने ११ हजार रुपयांचे प्रथम, प्रणाली पांडुरंग पाटील (कोल्हापूर) हिने ७ हजार रुपयांचे द्वितीय तर मंदार गोविंद लटपटे (गंगाखेड) याने ५ हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक पटकाविले. तसेच शेख इरफान इकबाल (औरंगाबाद) याने ३ हजार रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. आरती दत्तप्रसाद काळे व युवराज विलास अंभुरे यांना प्रोत्साहनपर बक्षीस वितरित करण्यात आले. साहेब शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी संभाजी ब्रिगेडचे रोहन काळे, स्वप्नील गरुड, गोपाल मोहिते, वैष्णव देशमुख, शिवराज बोखारे, माणिक शिंदे, चट्टे मामा, करण जाधव आदींनी प्रयत्न केले.