पं.स.ओस तर तहसीलमध्ये स्वच्छता

By Admin | Updated: November 6, 2014 13:46 IST2014-11-06T13:46:28+5:302014-11-06T13:46:28+5:30

दिवाळी सणाला पंधरवाडा लोटत असताना तरी अधिकारी-कर्मचार्‍यांच्या डोक्यातून सुट्टय़ा गेलेल्या नाहीत. बहुतांश विभागाचे प्रमुखच कार्यालयात हजर नसल्याने कर्मचार्‍यांना कोणी वालीच राहिले नाही.

Sanitation in PSSoos tehsil | पं.स.ओस तर तहसीलमध्ये स्वच्छता

पं.स.ओस तर तहसीलमध्ये स्वच्छता

हिंगोली : दिवाळी सणाला पंधरवाडा लोटत असताना तरी अधिकारी-कर्मचार्‍यांच्या डोक्यातून सुट्टय़ा गेलेल्या नाहीत. बहुतांश विभागाचे प्रमुखच कार्यालयात हजर नसल्याने कर्मचार्‍यांना कोणी वालीच राहिले नाही. परिणामी, बुधवारी बहूतांश विभागात हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच कर्मचारी दिसून आले. तर विभागप्रमुखांच्या खुच्र्या हवा खात असल्याने अधिकार्‍यांच्या दिवाळीत नागरिकांचे दिवाळे निघाल्याची प्रतिक्रिया बुधवारी 'लोकमत'ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनात ऐकावयास मिळाली.

सुनील पाठक

शुकशुकाट.. : हिंगोली तहसील कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या खुच्र्या रिकाम्या होत्या. कामकाज.. : हिंगोली येथील पंचायत समिती कार्यालयात कामकाज करताना कर्मचारी. हिंगोली : दिवाळी सणाला पंधरवाडा लोटत असताना तरी अधिकारी-कर्मचार्‍यांच्या डोक्यातून सुट्टय़ा गेलेल्या नाहीत. बहुतांश विभागाचे प्रमुखच कार्यालयात हजर नसल्याने कर्मचार्‍यांना कोणी वालीच राहिले नाही. परिणामी, बुधवारी बहूतांश विभागात हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच कर्मचारी दिसून आले. तर विभागप्रमुखांच्या खुच्र्या हवा खात असल्याने अधिकार्‍यांच्या दिवाळीत नागरिकांचे दिवाळे निघाल्याची प्रतिक्रिया बुधवारी 'लोकमत'ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनात ऐकावयास मिळाली.

गजानन वाखरकर, औंढा नागनाथ
दिवाळीच्या /सुट्यानंतर नोव्हेंबर महिन्यात सतत सुट्या असल्याने बुधवारी उघडलेल्या शासकीय कार्यालयात सकाळपासून अनेक अधिकारी- कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले. त्यामध्ये पं. स. मध्ये सर्वत्र रिकाम्या खुच्र्या दिसून आल्या. तहसील कार्यालयात मात्र सर्वच कर्मचारी हजर असल्याचे दिसून आले. यामुळे तालुक्यातील जनतेची कामे चांगलीच खोळंबल्याचे दिसून आले. 
दिवाळीच्या सुटयानंतर १ तारखेला शनिवार होता. २ ला रविवार तर ३ व ४ तारखेला सुद्धा सुट्याच होत्या. त्यानंतर थेट बुधवारीच सरकारी कार्यालये उघडण्यात आले. यावेळी थेट जनतेची कामे होत असलेल्या तहसील कार्यालयाला 'लोकमत' प्रतिनिधीने सकाळी १0.३0 वाजता भेट दिली असता या कार्यालयातील सर्वच विभागातील अधिकारी-कर्मचारी कामावर कार्यरत असल्याचे दिसून आले. 
तहसीलदार श्याम मदनूरकर यांनी सुट्टय़ांच्या अगोदर गैरहजर असलेल्या कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीसा दिल्याने या कार्यालयातील कर्मचारी वेळेचे भान ठेवत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पंचायत समिती कार्यालयात चमुने भेट दिली असता या कार्यालयात सकाळी ११ वाजता कृषी विभाग, बांधकाम विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय व आस्थापना विभागात एकही कर्मचारी व अधिकारी दिसून आला नाही. या कार्यालयातील सेवकच दरवाजाची रखवाली करताना दिसून आले.

 ■ महत्त्वाच्या विभागसह दुय्यम विभागातही प्रमुख हजर नव्हते. प्रामुख्याने त्यात वरिष्ठ भूजल वैज्ञानिक, महिला व बालविकास, माहिती व सूचना अधिकारी, पशूसंवर्धन उपायुक्त, पशूसंवर्धन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील समाजकल्याण, नगररचना, जिल्हा नियोजन अधिकारी, मानव विकास विभाग, उपजिल्हा अधिकारी कार्यालय, संपूर्ण स्वच्छता अभियान, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, आत्मा, कृषी विकास अधिकारी, तहसील कार्यालयाचाही समावेश आहे. येथे विभाग प्रमुख गैरहजर असल्याने नागरिकांची पंचायत झाली. 
> हिंगोलीतील पंचायत समिती, प्रभारी जिल्हाधिकारी, विधी विभाग, जिल्हा पुरवठा विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा संख्याकी अधिकारी, जि. प. समाजकल्याण विभाग, जि.प. शिक्षण विभाग, जि. प. सूक्ष्म लघूसिंचन विभाग, नगरपालिका, महावितरण, आगारप्रमुख आदी विभागातील अधिकारी उपस्थित होते.

भास्कर लांडे /हिंगोली

निवडणुका /आणि दिवाळी संपल्याने अधिकारी-कर्मचारी मोकळे झाले. दीपावलीच्या सुट्या हाताच्या बोटावर मोजता येतील एवढय़ाच दिवस होत्या. त्याला आज पंधरवडा उलटत असताना बहुतांश कार्यालयातील अधिकार्‍यांच्या केबीनचे दार बंद होते. बुधवारी दुपारी साडेबारा ते पाऊणे दोन दरम्यान प्रत्येक शासकीय कार्यालयात जाऊन केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये दिसून आले. अनेक ठिकाणी लेखा विभागातील कर्मचारी वगळता अन्य विभागातील कर्मचारीही सुट्यांचा आनंद घेत आहेत. म्हणून कार्यालयात कर्मचारी कमी आणि खुच्र्याच जास्त आढळून आल्या. परिणामी, कामानिमित्त बाहेरगावाहून आलेले ग्रामस्थ नाहक चकरा मारताना दिसून आले. आठ दिवसांपासून कामाविना ते परतत आहेत. खुद्द जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी रजेवर असल्याने बाकीच्या अधिकार्‍यांचे विचारण्याचीच गत नाही. म्हणून कार्यालये पूर्वपदावर येण्यास किती कालावधी लागेल हे अधिकार्‍यांकडूनच विचारून घ्यावे लागण्याची वेळ आली आहे.

राजकुमार देशमुख /सेनगाव
नोव्हेंबर /महिन्यात एक दिवसाआड सलग सुट्या असल्याने याचा परिणाम कार्यालयातील कामकाजावर झाला असून, अनेक कर्मचारी- अधिकारी कार्यालयाला दांडी मारीत असल्याचे चित्र बुधवारी येथील पंचायत समिती कार्यालयाच्या भेटी दरम्यानसमोर आले. तहसील कार्यालयात संभाव्य जिल्हाधिकार्‍यांच्या दौर्‍यामुळे स्वच्छता मोहिमेची मोठी लगबग होती.
येथील तहसील कार्यालयाला बुधवारी दुपारी ११ वाजता भेट दिली. यावेळी तहसील कार्यालयात कधी नव्हे, एवढे सफाईचे काम करताना शिपाई कर्तव्यात होते. प्रभारी तहसीलदार एस. एन. राऊत, नायब तहसीलदार पोले यासह जवळपास सर्वच कर्मचारी या वेळी हजर होते. सलग सुट्यामुळे नायब तहसीलदार रोडे, अव्वल कारकून गायकवाड हे रजेवर होते. जिल्हाधिकार्‍यांचा संभाव्य दौर्‍यामुळे सर्व कधी नव्हे, ते आज कार्यालयात वेळेवर येऊन कार्यालयीन कामकाजात मग्न होते. येथील पंचायत समिती कार्यालयात दुपारी ११.३0 च्या सुमारास भेट दिली असता पंचायत समिती कार्यालयात शांतता होती. कार्यालयाचे सर्व कक्ष उघडे होते; परंतु पंचायत, आस्थापना, लेखा, कृषी, आरोग्य या सर्व विभागात एकही कर्मचारी, अधिकारी हजर नव्हता. सेवकांचाही पत्ता नव्हता. केवळ आस्थापना विभागात ग्रामसेवक गवळी हा एकमेव कर्मचारी हजर होता.
ग्रामसेवक गवळी यांच्याकडे विचारणा केली असता सर्व अधिकारी कर्मचारी हिंगोली येथे कर्मचारी भरती परीक्षा ट्रेनिंगसाठी गेले असल्याचे सांगितले. कार्यालयात एकही अधिकारी-कर्मचारी नसल्याने ग्रामीण भागातून आलेले ग्रामस्थ हताश होवून माघारी फिरत होते. एकंदर सलग एक दिवस आड सुट्या व परीक्षेची ट्रेनिंगचा परिणाम पंचायत समिती कार्यालयावर तीव्रतेने जाणवला.

 औंढा पंचायत समिती कार्यालयात सकाळी ११ वाजेपर्यंत अधिकारी आढळून आले नाहीत. औंढा नागनाथ येथील पंचायत समिती कार्यालयात ग्रामस्थ अधिकार्‍यांच्या प्रतीक्षेत बसले होते.

Web Title: Sanitation in PSSoos tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.