जिल्हा परिषदेवर भगवा फडकविणार : जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:23 IST2021-08-19T04:23:19+5:302021-08-19T04:23:19+5:30
शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा शिवसंवाद मेळावा पार पडला. यावेळी खासदार जाधव बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाप्रमुख विशाल कदम, सहसंपर्कप्रमुख डॉ. ...

जिल्हा परिषदेवर भगवा फडकविणार : जाधव
शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा शिवसंवाद मेळावा पार पडला. यावेळी खासदार जाधव बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाप्रमुख विशाल कदम, सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, माणिक पौंढे, अर्जुन सामाले, दीपक बारहाते, राजू कापसे, सदाशिव देशमुख, नंदू पाटील, सखूबाई लटपटे, अंबिका डहाळे आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना खासदार जाधव म्हणाले की, परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवर भगवा फडकविणार म्हटले की, राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकते. त्यामुळे राज्यात आता युती असली तरी पुढे युती होणार की नाही? हे माहीत नाही. परंतु, आम्ही पूर्ण तयारी केली आहे. कोणतीही निवडणूक लढविण्यास आम्ही समर्थ आहोत. तुम्ही सोबत आलात तर तुमच्यासोबत अन्यथा तुमच्या शिवाय स्वबळावर निवडणूक लढवू, असेही खा. जाधव म्हणाले. यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.