अक्षरकाव्य सन्मान स्पर्धेत सचिन शिंदे प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:03 IST2021-02-05T06:03:19+5:302021-02-05T06:03:19+5:30

या स्पर्धेचा निकाल २६ जानेवारी रोजी दुपारी स्पर्धेचे संयोजक सुरेश हिवाळे, शरद ठाकर, दिगंबर रोकडे यांनी जाहीर केला. अक्षरकाव्य ...

Sachin Shinde first in Aksharkavya Sanman competition | अक्षरकाव्य सन्मान स्पर्धेत सचिन शिंदे प्रथम

अक्षरकाव्य सन्मान स्पर्धेत सचिन शिंदे प्रथम

या स्पर्धेचा निकाल २६ जानेवारी रोजी दुपारी स्पर्धेचे संयोजक सुरेश हिवाळे, शरद ठाकर, दिगंबर रोकडे यांनी जाहीर केला. अक्षरकाव्य सन्मान कविता लेखन स्पर्धेचे प्रथम पारितोषिक उमरगा येथील कवी सचिन शिंदे यांच्या 'पातीवरल्या बाया' या कवितेला तर द्वितीय नाशिक येथील कवी संदीप भांबेरे यांच्या 'शुभ्र फुलांच्या...’, तृतीय सोनपेठ येथील कवयित्री राही कदम यांच्या 'माझी माय', उत्तेजनार्थ पारितोषिक मंठा येथील कवी शिरिष देशमुख यांच्या 'माय' , परभणी येथील कवयित्री त्रिवेणी पाटील यांच्या 'नेमके काय चुकले' या कवितेला मिळाले आहे. अक्षरकाव्य सन्मान कविता लेखन स्पर्धेचे परीक्षक म्हणून गझलकार अरविंद सगर, कवी माणिक पुरी, प्रा.हनुमान व्हरगुळे यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वितेसाठी अक्षर प्रतिष्ठानचे सर्जेराव लहाने, प्रा.सतीश मगर, रमेश नखाते, किशन कटारे, डॉ.काशिनाथ पल्लेवाड यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Sachin Shinde first in Aksharkavya Sanman competition