Russia Ukrain: जीव वाचवून युक्रेनमधून निघाले अन दुसऱ्या देशात अडकले २०० भारतीय विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2022 16:32 IST2022-02-28T16:31:27+5:302022-02-28T16:32:55+5:30
Russia Ukrain: आम्ही मायभूमीवर पाय ठेवण्यास आतुर झालो आहोत. आम्हाला भारतीयांना वैद्यकीय सेवा देयची आहे.

Russia Ukrain: जीव वाचवून युक्रेनमधून निघाले अन दुसऱ्या देशात अडकले २०० भारतीय विद्यार्थी
गंगाखेड (परभणी) : युक्रेन येथील ओडेसा राष्ट्रीय वैद्यकीय विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना आहे त्या परिस्थितीत देश सोडून जाण्यास सांगितले आहे. यामुळे येथे शिक्षण घेत असलेले २०० भारतीय विद्यार्थी दुपारी ११ वाजता युक्रेन जवळील मोल्दोव्हा देशात पोहचले आहेत. गंगाखेड येथील संकेत पाठव हा सद्धा या विद्यार्थ्यांसोबत येथे अडकलेला आहे. त्याने वडिलांना फोन करून, भारतात येण्याची काहीतरी व्यवस्था करा, येथिल परिस्थिती अत्यंत खराब आहे, असे अर्जव केले आहे.
युक्रेन येथिल ओडेसा वैद्यकीय विद्यापिठाने तात्काळ देश सोडण्याचे आदेश दिल्याने येथे शिक्षण घेत असलेल्या २०० भारतीय विद्यार्थ्यांनी मोल्दोव्हा देशात जाण्याचे निश्चित केले. तब्बल १५ हजार रुपयांचे तिकीट काढून खाजगी बसने हे विद्यार्थी मोल्दोव्हात पोहचले आहेत. मात्र, येथून विमानाचे उड्डाण बंद असल्याना सर्व विद्यार्थी येथेच अडकले आहेत.
आमचे हाल होत आहेत
एका बसमध्ये ५५ विद्यार्थांनी प्रवास केला, येथे जेवणाची व्यवस्था नाही. आम्ही मायभूमीवर पाय ठेवण्यास आतुर झालो आहोत. आम्हाला भारतीयांना वैद्यकीय सेवा देयची आहे.
- संकेत पाठक, विद्यार्थी
शासनाने तत्काळ मदत करावी
तेथे संकटात असलेले सर्व विद्यार्थी माझे मुलच समजतो. माझ्या मुलासह इतर विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र,राज्य शासनाकडे पाठपुरावा करत आहे. मात्र, आणखी यश आले नाही. ठेथिल विद्यार्थ्यांची काळजी वाटते. शासनाने तात्काळ मदत करावी.
- राघवेंद्र पाठक, पालक