उखळी येथे ग्रामविकास आराखड्याचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:19 IST2021-02-24T04:19:24+5:302021-02-24T04:19:24+5:30
प्रारंभी संत गाडगेबाबा यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सदस्य दिनकर तिथे, विस्तार अधिकारी आर.बी. ...

उखळी येथे ग्रामविकास आराखड्याचे प्रशिक्षण
प्रारंभी संत गाडगेबाबा यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सदस्य दिनकर तिथे, विस्तार अधिकारी आर.बी. पंडित, सरपंच राजेभाऊ सावंत उपस्थित होते. केंद्रप्रमुख उत्तम सुरनर यांनी प्रास्ताविक केले. बी.आर. पंडित, ग्रामविकास अधिकारी एम.के. सय्यद यांनी आराखड्यासंदर्भात माहिती दिली. यावेळी जि.प. सदस्य दिनकर तिथे, सरपंच राजेभाऊ सावंत, उपसरपंच नवनाथ मुजमुले, विठ्ठल सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रामसेवक सोळंके, केदार शिंदे, विकास मुंडे, कारबेटवाडीचे सरपंच चौधरी, सरपंच रामेश्वर पोते, माणिक मुंडे, उपसरपंच धम्मपाल सावंत, लहू पवार, गौतम मुजमुले, भगवान रासवे, संजय सावंत, रामेश्वर सावंत, अर्जुन हांडे, मीरा सुदाम सावंत, मीना डोणे, स्वाती भानुदास सावंत, मुख्याध्यापक दत्ता शिंगाडे, चांगदेव केदार, पशुधन पर्यवेक्षक चौधरी, सीआरपी करुणा वाघमारे, मंदाकिनी सावंत,दीप्ती सावंत, रोहिणी मुजमुले, मीरा मुजमुले आदींची उपस्थिती होती. देवकुमार किरवले, अर्जुन सावंत, अंकुश सावंत यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. पिंगोरे यांनी सूत्रसंचलन केले.