शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही लाटेत ग्रामीण भाग आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:14 IST

मागीलवर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. सुरुवातीच्या काळात रुग्णांची संख्या बोटावर मोजण्याइतकी असली तरी, हळूहळू त्यात मोठी वाढ ...

मागीलवर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. सुरुवातीच्या काळात रुग्णांची संख्या बोटावर मोजण्याइतकी असली तरी, हळूहळू त्यात मोठी वाढ होत गेली. पहिला लाटेमध्ये केवळ ७ हजार ५५१ रुग्णांची जिल्ह्यात नोंद झाली; मात्र दुसर्‍या लाटेत जिल्ह्यातील रुग्णसंख्या वेगाने वाढली. प्रत्येकदिवशी ४०० ते ५०० रुग्ण नोंद झाले. जिल्ह्यातील हा संसर्ग आता कमी झाला असला, तरी दोन्ही लाटेत नोंद झालेल्या एकूण ५० हजार ७०४ रुग्णांपैकी ग्रामीण भागांमध्ये ३० हजार ३६५ रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. शहरी भागाशी तुलना करता, ग्रामीण भागात ५९.८८ टक्के रुग्ण नोंद झाले आहेत. उर्वरित रुग्ण शहरी भागातील आहेत.

कोरोनाबाधित रुग्णांची ही आकडेवारी पाहता, येत्या काळात शहरापेक्षा ग्रामीण भागावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटेत ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा फारशी मजबूत नव्हती. कोरोनाच्या तपासण्याबरोबरच रुग्णांचे रुग्णालयांमध्ये दाखले होण्याचे प्रमाणही अत्यल्प आहे. परिणामी ग्रामीण भागात हा संसर्ग वेगाने वाढत गेला. गावेच्या गावे कोरोना बाधित झाली. जिल्ह्यात ८०४ गावे असून, त्यापैकी ७११ गावांमध्ये कोरोना पोहोचला. ही बाब लक्षात घेता, शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते.

एप्रिल महिन्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल महिना जिल्ह्यासाठी डोकेदुखी ठरला. या काळात सर्वाधिक २३ हजार २२ रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, डिसेंबर २०२० अखेर जिल्ह्यात केवळ ७ हजार ५५१ रुग्णांची नोंद झाली होती. जानेवारी ते मे या पाच महिन्यांत तब्बल ४३ हजार १५३ रुग्णांची नोंद झाली आहे. जानेवारी महिन्यात ३३५, फेब्रुवारी महिन्यात ६४४, मार्चमध्ये ६ हजार ७७३, एप्रिल महिन्यात २३ हजार २२ आणि मे महिन्यामध्ये १२ हजार ३७९ रुग्णांची नोंद झाली आहे.

तोकडी आरोग्य सुविधा

ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांमधून आरोग्य सेवा दिली जाते; मात्र सध्याची स्थिती लक्षात घेता, ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे आरोग्य सेवा पुरविताना तारेवरची कसरत करावी लागते. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता, ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे.