शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

"आदरणीय चंद्रकांतदादा हे पहा खड्डे" ; गंगाखेड-परभणी रस्त्यावरील खड्डयात विरोधी पक्षनेते धंनजय मुडे यांचा सेल्फी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 16:37 IST

वाशिम येथे कार्यक्रमाला जाताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गंगाखेड -परभणी रस्त्यावर पडलेल्या खड्डयांसोबत सेल्फी काढला.

गंगाखेड (परभणी ) : वाशिम येथे कार्यक्रमाला जाताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गंगाखेड -परभणी रस्त्यावर पडलेल्या खड्डयांसोबत सेल्फी काढुन गेल्या चार वर्षात रस्ते दुरुस्तीवर खर्च केलेले हजारो कोटी रुपये नेमके कुणाच्या खिशात गेले असा प्रश्न राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना विचारला आहे.

परळी मुक्कामी असलेले राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे आज परळी कृऊबा सभापती सूर्यभान नाना मुंडे, डॉ. देविदास चव्हाण, बाळासाहेब सोनवणे यांच्या समवेत गंगाखेड-परभणी मार्गे वाशिम येथील कार्यक्रमासाठी जात होते. यादरम्यान गंगाखेड-परभणी मार्गावर पडलेल्या खड्डयामुळे रस्त्यांची झालेली दुरावस्था त्यांच्या लक्षात आली. 

या रस्त्याची खड्डयांमुळे झालेली अवस्था पाहून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या मार्गावर पडलेल्या खड्डयांजवळ आपल्या वाहनांचा ताफा थांबवून चक्क खड्डयात बसून सेल्फी काढला. यानंतर हा सेल्फी मुंडे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केला. तसेच,"आदरणीय दादा, गंगाखेड -परभणी रस्त्यावरील हे पहा खड्डे. सरकारच्या नाकर्तेपणा मुळे राज्यात इतके विक्रमी खड्डे झाले आहेत की 'गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड'ने आता दखल घ्यावी. रस्ते दुरुस्तीवर मागील ४  वर्षात खर्च केलेले हजारो कोटी रु नेमके कोणाच्या खिशात गेले ? असा प्रश्न उपस्थित करून जोरदार टीका केली.  

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेPotholeखड्डेparabhaniपरभणीroad safetyरस्ते सुरक्षाchandrakant patilचंद्रकांत पाटील