दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:47 IST2020-12-04T04:47:26+5:302020-12-04T04:47:26+5:30

परभणी येथील वृक्षमित्र कैलास गायकवाड व त्यांची पत्नी वंदना गायकवाड हे २००८ पासून वृक्ष लावगडीचे काम करतात. या दाम्पत्याने ...

Resolution to plant ten thousand trees | दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

परभणी येथील वृक्षमित्र कैलास गायकवाड व त्यांची पत्नी वंदना गायकवाड हे २००८ पासून वृक्ष लावगडीचे काम करतात. या दाम्पत्याने आयुष्यात येणारा प्रत्येक उत्सव हा वृक्ष लागवडीने साजरा करण्याचा नवा पायंडा शहरात घालून दिला आहे. आतापर्यंत २५ हजारांच्या वर वृक्षांची लागवड विविध ठिकाणी लोकसहभागातून केली आहे. आतापर्यंत ५ हजारांच्या वर वृक्षदानही केले आहेत. त्यामुळे आगामी काळात १० हजार वृक्ष लागवडीचा संकल्प त्यांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी केला आहे. यावेळी राजू घनसावंत, निर्मला घनसावंत, धिरेंद्र पंडित, कल्पना घनसावंत, बाबूराव निकाळजे, प्रदीप वाकळे, कविता पंडित, रामन घनसावंत, शोभा कापसे, महेंद्र बनसोडे, मंगला बनसोडे, विश्वजीत गायकवाड आदींची उपिस्थती होती.

Web Title: Resolution to plant ten thousand trees