एक हजार बोधीवृक्ष लागवडीचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:14 IST2021-05-28T04:14:32+5:302021-05-28T04:14:32+5:30
परभणी शहरातील गजानन नगर भागात बुधवारी बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना वृक्षमित्र कैलास गायकवाड म्हणाले ...

एक हजार बोधीवृक्ष लागवडीचा संकल्प
परभणी शहरातील गजानन नगर भागात बुधवारी बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना वृक्षमित्र कैलास गायकवाड म्हणाले की, बोधीवृक्ष (पिंपळ) हे २४ तास ऑक्सिजन देणारे झाड आहे. तसेच गौतम बुद्ध यांना याच बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली होती. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजनचे महत्व अधोरेखित झाले आहे. भरमसाठ वृक्षतोडीमुळे व प्रदूषणामुळे ऑक्सिजनची लेवल कमी होत आहे. यावर एकमेव उपाय म्हणजे जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे हाच आहे. ज्या नगरात, घराच्या परिसरात जास्तीत जास्त वृक्ष लागवड केलेली आहे, तेथील ऑक्सिजनचे प्रमाण नक्कीच जास्तीचे आहे. त्यामुळे भविष्यातील भयावह परिस्थिती टाळायची असेल तर प्रत्येकाने एक तरी वृक्ष लावला पाहिजे. आपण स्वत: येत्या २ महिन्यात जिल्ह्यात १ हजार बोधीवृक्ष लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नागरिकांची उपस्थिती होती.