आरक्षण सुटले , पण महिला सदस्यच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:03 IST2021-02-05T06:03:26+5:302021-02-05T06:03:26+5:30

पालम तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी तहसील कार्यालयात २५ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता सोडत काढण्यात आली. मोजके ...

Reservations missed, but no female members | आरक्षण सुटले , पण महिला सदस्यच नाही

आरक्षण सुटले , पण महिला सदस्यच नाही

पालम तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी तहसील कार्यालयात २५ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता सोडत काढण्यात आली. मोजके गावे वगळता निवडणूकपूर्वी जाहीर झालेले आरक्षण बहुतांश ठिकाणी कायम राहिले आहे. तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणारी पेठशिवणी ग्रामपंचायत अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित करण्यात आली आहे. मात्र, या गावात या प्रवर्गातील महिला सदस्य निवडून आलेली नाही. तसेच फळा येथील सरपंच पदासाठी याच प्रवर्गातील सदस्यांसाठी आरक्षित करण्यात आला आहे. या गावातही या प्रवर्गातील महिला सदस्य निवडून आलेली नाही. त्यामुळे दोन्ही गावात सरपंच पदासाठी महिला सदस्य नसल्याने निवडीपूर्वी पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Reservations missed, but no female members