आरक्षणाच्या विरोधातील अध्यादेश रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:15 IST2021-06-02T04:15:11+5:302021-06-02T04:15:11+5:30
परभणी : मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवून आरक्षणाच्या विरोधात काढलेला शासन अध्यादेश रद्द करावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ ...

आरक्षणाच्या विरोधातील अध्यादेश रद्द करा
परभणी : मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवून आरक्षणाच्या विरोधात काढलेला शासन अध्यादेश रद्द करावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने १ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षणाची तरतूद केली आहे ; परंतु राज्य शासनाने शासन आदेश काढून मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण रद्द केले आहे. या निर्णयामुळे हजारो मागासवर्गीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे नुकसान होत आहे. अधिकारी-कर्मचारी आरक्षणाच्या सवलतीपासून वंचित राहात आहेत. तेव्हा हा अन्यायकारक शासन आदेश रद्द करावा, अशी मागणी करीत रिपाइंच्या वतीने आंदोलन करण्यात आली. रिपाइंचे राज्य संघटक डी. एन. दाभाडे यांच्यासह रानूबाई वायवळ, जयप्रकाश इंगोले, निवृत्ती हत्तीहंबिरे, शेख सरफराज, भगवान कांबळे, अप्पा गाढे, भाऊराव सावणे, विजय वाघमारे, गणपत हत्तीअंबिरे, संजय टेकुळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.