रेल्वे रिझर्व्हेशनच्या रांगेपासून आता परभणीकरांची मुक्तता
By Admin | Updated: February 3, 2015 17:04 IST2015-02-03T17:04:15+5:302015-02-03T17:04:15+5:30
जलतरणिका संकुलातील तन-मन-धन सेवा यांना भारत सरकारच्या रेल मंत्रालयाने रिझर्व्हेशनची सेवा उपलब्ध करुन दिल्याने परभणीकर नागरिकांना रेल्वेस्थानकावरील रिझर्व्हेशनच्या रांगेपासून मुक्तता मिळणार आहे.

रेल्वे रिझर्व्हेशनच्या रांगेपासून आता परभणीकरांची मुक्तता
परभणी : येथील जलतरणिका संकुलातील तन-मन-धन सेवा यांना भारत सरकारच्या रेल मंत्रालयाने रिझर्व्हेशनची सेवा उपलब्ध करुन दिल्याने परभणीकर नागरिकांना रेल्वेस्थानकावरील रिझर्व्हेशनच्या रांगेपासून मुक्तता मिळणार आहे.
कुठलाही प्रवास करायचा म्हटले की पहिले टेंशन रिझर्व्हेशनचे येते. त्यासाठी नानाविध प्रयत्न केले जातात. परंतु तरीही अनेकांना रिझर्व्हेशनपासून मुकावे लागत होते. पर्यायाने प्रवासातील तणावाचा सामना करावा लागत होता. परंतु आता येथील तन-मन-धन सेवा यांच्याकडे रेल यात्री सुविधा केंद्र (/ं१्रं'>ळरङ/ं१्रं'>) कार्यान्वित झाले आहे. त्यामुळे आता रेल्वेस्थानकाच्या वेळेपेक्षा जास्त वेळ या ठिकाणी रिझर्व्हेशनची सुविधा उपलब्ध राहणार आहे. जसे सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत आणि रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत रिझर्व्हेशन करता येणार आहे.त्याचप्रमाणे तत्काळमध्ये रिझर्व्हेशन सकाळी ११ नंतर सुरू राहणार आहे. तन-मन-धन सेवा या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध झाल्याने प्रवाशांची रिझर्व्हेशनच्या रांगेपासून मुक्तता तर होणारच आहे.शिवाय अद्ययावत सॉफ्टवेअरमुळे आरक्षण कोटा, जागेची क्षमता आदीविषयीची माहिती एका फोनवर मिळणार आहे. त्यासाठी 0२४५२-२२९९९९ या क्रमांकावर संपर्क साधून सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तन-मन-धनचे नंदूसेठ तापडिया यांनी केले आहे. मागील ६ वर्षांपासून या ठिकाणी सकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत रेल्वेचे जनरल तिकीट मिळते, हे विशेष. /(वाणिज्य प्रतिनिधी)