गौण खनिज वाहतुकीतून ३४ लाखांची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:16 IST2021-04-25T04:16:48+5:302021-04-25T04:16:48+5:30
गंगाखेड : तालुक्यात महसूल प्रशासनाच्या वतीने २०२०-२१ या वर्षात अवैध गौण खनिज वाहतुकीतून ३४ लाख ७६ हजार १९७ ...

गौण खनिज वाहतुकीतून ३४ लाखांची वसुली
गंगाखेड : तालुक्यात महसूल प्रशासनाच्या वतीने २०२०-२१ या वर्षात अवैध गौण खनिज वाहतुकीतून ३४ लाख ७६ हजार १९७ रुपयांची वसुली केली आहे. यामध्ये माती, मुरूम, दगड यासह इतर गौण खनिजांची अवैध वाहतूक करणार्या वाहनांवर दंड आकारून ही वसुली केली आहे.
गंगाखेड तालुक्यात मागील काही वर्षांमध्ये अवैध गौण खनिजाची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल व पोलिस प्रशासनाच्या वतीने थातूरमातूर कारवाई करून दंड आकारला जातो. मात्र त्यानंतर अवैध गौण खनिज वाहतूकदारांना मोकळे रान सोडून देण्यात येते. त्यामुळे २०२०-२१ या आर्थिक वर्षात महसूल विभागाने गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणी कारवाई करून ३४ लाख ७६ हजार १९७ रुपयांची वसुली केली आहे. यामध्ये जानेवारी महिन्यात ४ लाख ६४ हजार ६९७ रुपये, फेब्रुवारीमध्ये ९ लाख ६६ हजार ४३४, मार्च महिन्यात ८ लाख ७२ हजार ७४ रुपये, जून महिन्यात ५ लाख २३ हजार ६००, ऑक्टोबर महिन्यात १ लाख ३० हजार ९००, नोव्हेंबर मध्ये ४ लाख ९१ हजार ९२ रुपये, तर डिसेंबर महिन्यात १ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सात महिन्यांत अवैध गौण खनिज वाहतूक करणारी वाहने महसूल कर्मचाऱ्यांना आढळून आली नसल्याने गंगाखेड शहर व तालुक्यातील नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.