वाया गेलेल्या पाण्याची रक्कम अधिकाऱ्यांकडून वसूल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:14 IST2021-06-04T04:14:44+5:302021-06-04T04:14:44+5:30
यासंदर्भातील निवेदनात म्हटले आहे की, जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून १ महिन्यापूर्वी पाणी सोडण्यात आले, आहे. या पाण्याचा शेतकरी उपयोग करीत ...

वाया गेलेल्या पाण्याची रक्कम अधिकाऱ्यांकडून वसूल करा
यासंदर्भातील निवेदनात म्हटले आहे की, जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून १ महिन्यापूर्वी पाणी सोडण्यात आले, आहे. या पाण्याचा शेतकरी उपयोग करीत नाहीत. त्यामुळे हे पाणी वाहून नदीपात्रात व नाल्यामध्ये जात आहे. या विभागातील अधिकाऱ्यांचे कोणाचेही कर्मचाऱ्यांवर व पाणी वाटपाच्या नियोजनावर नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे हे पाणी निर्धारित वेळेत बंद का करण्यात आले? नाही? कोणाच्या आदेशाने ते सोडण्यात आले? भविष्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यास त्यास जबाबदार कोण? याची चाैकशी करून, यास जबाबदार अधिकाऱ्यांच्या पगारातून वाया गेलेल्या पाण्याची रक्कम वसूल करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनावर जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, शहर प्रमुख पिंटू कदम, दिव्यांग आघाडीचे ज्ञानेश्वर पंढरकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.