शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'भाजपचा डाव ओळखा, शिंदे साहेब आता परत या!' उद्धवसेनेच्या खासदाराचे भावनिक आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 12:16 IST

भाजपच्या चाणक्य नीतीला उत्तर द्यायचं असेल तर एकत्र या!दोन्ही शिवसेना एकत्र येण्यासाठी खासदारांची भावनिक साद.

परभणी: परभणी महानगरपालिका निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मिळवलेल्या घवघवीत यशानंतर आणि शिंदेसेनेचा 'भोपळा'ही न फुटल्याने राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर परभणीचे खासदार संजय जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपचा डाव ओळखण्याचा सल्ला देत, दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

भाजपची चाणक्य नीती आणि शिंदेसेनेची कोंडी पत्रकारांशी बोलताना खासदार जाधव यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, "भाजप ही चाणक्य नीती वापरणारा पक्ष आहे. त्यांनी आधी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाचं गाजर दाखवलं आणि शिवसेनेचे दोन तुकडे केले. आधी उद्धव ठाकरे यांना संपवण्याचा प्रयत्न झाला आणि आता एकनाथ शिंदे यांना संपवण्याचा घाट घातला जात आहे. महापालिका निवडणुकीत मराठवाड्यात शिंदेसेनेला बसलेला फटका हा याच नीतीचा भाग आहे."

"बाळासाहेबांची पुण्याई अन् रेडिमेड माणसं" खासदार संजय जाधव यांनी अत्यंत कडक शब्दात सुनावले की, एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र पिंजून पक्ष उभा केलेला नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी रक्त आटवून ही शिवसेना उभी केली. शिंदे यांनी केवळ 'रेडिमेड' माणसं आणि चिन्ह उचलले आहे. "शिंदे साहेबांनी आता तरी विचार करावा, भाजपचा हा डाव हाणून पाडण्यासाठी त्यांनी पुन्हा मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंच्या सोबत आले पाहिजे. कारण शेवटी बाप हा बापच असतो," असेही ते भावूक होऊन म्हणाले.

परभणी पॅटर्नचा दाखला मराठवाड्यात सर्वत्र शिंदेसेनेचा सपाटून पराभव झाला असताना परभणीत मात्र ठाकरे गटाने आपली ताकद दाखवून दिली आहे. भाजप आर्थिक बळावर निवडणुका जिंकत असली तरी, शिवसैनिक जेव्हा एकत्र असतो तेव्हा कुणाचीही वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत नसते, याची आठवणही त्यांनी करून दिली. आता संजय जाधव यांच्या या आवाहनावर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Uddhav's Sena urges Shinde to return, recognizing BJP's strategy.

Web Summary : Following Parbhani's win, Uddhav's Sena MP Sanjay Jadhav urges Eknath Shinde to recognize BJP's divisive tactics. He appeals for Shinde's return to Matoshree, emphasizing Balasaheb's legacy and the strength of a united Shiv Sena against BJP's influence, referencing Parbhani's success.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाsanjay jadhav ubtसंजय जाधव