रावराजुरात वाळू उपश्यासह दारूविक्री ठरतेय डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:16 IST2021-04-15T04:16:26+5:302021-04-15T04:16:26+5:30
गंगाखेड : पालम तालुक्यातील रावराजूर या गावात सध्या अवैध दारू विक्री, वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गावकऱ्यांसाठी हा ...

रावराजुरात वाळू उपश्यासह दारूविक्री ठरतेय डोकेदुखी
गंगाखेड : पालम तालुक्यातील रावराजूर या गावात सध्या अवैध दारू विक्री, वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गावकऱ्यांसाठी हा प्रकार डोकेदुखी ठरत असून, तक्रार करणाऱ्यांना वाळू माफियांकडून धमक्या दिल्या जात असल्याने नागरिक तक्रारी करण्यास घाबरत आहेत.
गंगाखेड व पालम तालुक्याच्या सीमेवर असलेल्या रावराजूर हे गाव गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले गाव आहे. या भागातील गोदावरी नदी पात्रातून रात्रंदिवस वाळूचा अवैध उपसा केला जातो. त्यामुळे गाव परिसरात वाळू माफियांचा वावर वाढला असून, त्याचा ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर हे गाव असून, प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. अवैध वाळू उपसा बरोबरच अवैधरीत्या दारूची विक्री, जुगार अड्डे बिनधास्तपणे सुरू आहेत. तळीरामांचा उपद्रव आणि त्यांच्यामुळे गावात नेहमीच गोंधळाची स्थिती निर्माण होते. मात्र या सर्व प्रकाराविरुद्ध कोणी तक्रार करण्यास समोर आलाच तर त्यास खोटे गुन्हे दाखल करण्याच्या आणि मारहाणीच्या धमक्या मिळत आहेत. त्यामुळे तक्रार कोणी करावी, असा प्रश्न निर्माण होतो. पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रावराजूर गावातील अवैध धंद्यांना लगाम घालावा, अशी मागणी होत आहे.