राव्हा, आडगावात पथकाची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:17 IST2021-02-10T04:17:33+5:302021-02-10T04:17:33+5:30
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी शौचालयाच्या वापराची जनजागृती करण्यासाठी गुडमॉर्निंग पथकांची स्थापना केली आहे. ९ ...

राव्हा, आडगावात पथकाची जनजागृती
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी शौचालयाच्या वापराची जनजागृती करण्यासाठी गुडमॉर्निंग पथकांची स्थापना केली आहे. ९ फेब्रुवारी रोजी गट विकास अधिकारी विष्णू मोरे यांच्या नेतृत्वाखाली गुड मॉर्निंग पथकाने पहाटे राव्हा आणि आडगाव दराडे या दोन गावांना भेट दिली. उघड्यावर शौचास जाणाऱ्या ग्रामस्थांना थांबवून शौचालयाचा वापर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. त्याचप्रमाणे ‘माझे गाव सुंदर गाव’ उपक्रमांतर्गत प्लास्टीक जमा करण्याची मोहीम, परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी श्रमदान आदी विषयी माहिती देण्यात आली. यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी डी. एस. अहिरे, आरोग्य विस्तार अधिकारी सुधाकर धायडे, अभियंता रमेश गिरी, अंभोरे, उस्मान यांच्यासह गावातील आशा, अंगणवाडी ताई, मदतनीस व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.