रामपुरीला पर्यटनाचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:13 IST2021-07-18T04:13:43+5:302021-07-18T04:13:43+5:30

मानवत तालुक्यातील रामपुरी बु. येथे जिल्हा परिषदेच्या विविध विकास निधीतून तसेच अन्य योजनांमधून मंजूर करण्यात आलेल्या ७० लाखांच्या ...

Rampuri will try to get the status of tourism | रामपुरीला पर्यटनाचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणार

रामपुरीला पर्यटनाचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणार

मानवत तालुक्यातील रामपुरी बु. येथे जिल्हा परिषदेच्या विविध विकास निधीतून तसेच अन्य योजनांमधून मंजूर करण्यात आलेल्या ७० लाखांच्या विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन राजेश विटेकर यांच्या उपस्थित १७ जुलेै रोजी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी ओमप्रकाश यादव, कारखान्याचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर यादव, विनायकराव यादव, गुलाबराव यादव, सरपंच दुर्गा साठे, उपसरपंच विशाल यादव, बाळुकाका यादव, पंढरीनाथ चव्हाण, सुधाकरराव यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे मानवत तालुकाध्यक्ष संतोष लाडाणे, हातलवाडीचे सरपंच कृष्णा शिंदे, पाळोदीचे सुरज काकडे, हाटकरवाडीचे सरपंच आश्रोबा पाटील जोरावर यांची उपस्थिती होती. यावेळी विटेकर यांनी जिल्हा परिषदेमार्फत मंजूर केलेल्या स्मशानभूमी स्मृती उद्यान (३ लाख), सोलर पंप (२ लाख ५० हजार), सिमेंट रस्ता (५ लाख), स्मृती उद्यान सौंदर्यीकरण (७ लाख ६५ हजार), स्मशानभूमी सुशोभीकरण (५ लाख), तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत सिमेंट रस्ता (१० लाख), तीर्थक्षेत्र परिसर सुशोभीकरण (२५ लाख), पंधराव्या वित्त आयोगांतर्गत रामपुरी स्मशानभूमी स्मृती उद्यान (३ लाख), सोलार पंप (२ लाख ५० हजार), तीर्थक्षेत्र सुशोभीकरण (२५ लाख) आदी विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राधाकिशनराव यादव, माधवराव यादव, प्रभाकर यादव, भानुदास यादव, बालू यादव, शिवाजीराव यादव, भगवानराव यादव, विशाल कागदे, संदीप गायकवाड, मारोतराव गायकवाड, विठ्ठल भिसे, रामराव चव्हाण आदींची उपस्थिती होती.

Web Title: Rampuri will try to get the status of tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.