पुलाच्या सुरक्षेबाबत रेल्वे प्रशासन सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:31 IST2020-12-14T04:31:41+5:302020-12-14T04:31:41+5:30

गंगाखेड : गंगाखेड शहराजवळील रेल्वे पुलाच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासन सतर्क आहे. वार्षिक तपासणी करून पुलाची सुरक्षितता तपासण्यात येते, अशी ...

Railway administration alerted about the safety of the bridge | पुलाच्या सुरक्षेबाबत रेल्वे प्रशासन सतर्क

पुलाच्या सुरक्षेबाबत रेल्वे प्रशासन सतर्क

गंगाखेड : गंगाखेड शहराजवळील रेल्वे पुलाच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासन सतर्क आहे. वार्षिक तपासणी करून पुलाची सुरक्षितता तपासण्यात येते, अशी माहिती दक्षिण-मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी राकेश यांनी दिली.

गंगाखेड शहराजवळील परभणी विभागातील ब्रीज क्रमांक २ ओएफ आहे. या पुलाची स्थिती सीआरएनएस ब्रीज म्हणून रेल्वेकडे नोंदवली गेली आहे. पुलाची उभारणी चिनाई फाऊंडेशन आणि स्टीलच्या ग्रडरद्वारे करण्यात आली आहे. पुलावरच्या लोडिंगआधारित पाया मजबुतीकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष आहे. दरवर्षी मार्च महिन्यात वार्षिक तपासणी करून पुलाच्या सुरक्षिततेचा आढावा घेण्यात येतो.

पुलाच्या कोणत्याही घटकाबाबत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रेल्वे प्रशासन सतर्क आहे. पुलाला कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी पुरेपूर लक्ष दिले जाते. कोरोनाच्या कालावधीत मार्च २०२० मध्ये या रेल्वे पुलाची वार्षिक तपासणी करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत रेल्वे प्रशासन नेहमी सतर्ककता बाळगते, असे दक्षिण-मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी राकेश यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Web Title: Railway administration alerted about the safety of the bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.