जांब रस्त्यावरील जुगार अड्ड्यावर छापा; दीड लाखाचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:17 IST2021-04-11T04:17:02+5:302021-04-11T04:17:02+5:30
पाथरी रस्त्यावरून जांब या गावाकडे जाणाऱ्या एका शेतात जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे ९ एप्रिल ...

जांब रस्त्यावरील जुगार अड्ड्यावर छापा; दीड लाखाचा मुद्देमाल जप्त
पाथरी रस्त्यावरून जांब या गावाकडे जाणाऱ्या एका शेतात जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे ९ एप्रिल रोजी रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास शेख नबी अब्दुल खादर यांच्या शेतातील अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. तेव्हा ८ जण गोलाकार बसून झन्नामन्ना नावाचा जुगार खेळताना मिळून आले. या कारवाईत पोलिसांनी रोख ५८ हजार ८२० रुपये, दोन मोटारसायकल आणि मोबाइल असा १ लाख ४५ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस कर्मचारी शेख अजहर शेख जफर यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शेख मुसा शेख जमाल, शेख असिफ शेख रशीद, शेख मुख्तार शेख इस्माईल, इरफान खान करीमखान, शेख रफिक शेख हबीब, युसूफ खान नबाब खान पठाण, सोहेल बेग नजीर बेग आणि मोहसीन खान इकबाल खान या ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जयंत मीना, अपर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने केली.