अवैध सावकारीप्रकरणी चारठाणा येथे छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:19 IST2021-09-03T04:19:29+5:302021-09-03T04:19:29+5:30
परभणी : जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे अवैध सावकारी केल्याच्या प्रकरणात सहकार विभागाने टाकलेल्या छाप्यात आक्षेपार्ह दस्तावेज आढळले आहेत. जिंतूर ...

अवैध सावकारीप्रकरणी चारठाणा येथे छापा
परभणी : जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे अवैध सावकारी केल्याच्या प्रकरणात सहकार विभागाने टाकलेल्या छाप्यात आक्षेपार्ह दस्तावेज आढळले आहेत.
जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील वैजनाथ मल्लिकार्जुन गजमल हे अवैध सावकारी व्यवसाय करीत असल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधकांकडे करण्यात आली होती. या तक्रारीवरून जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली २ सप्टेंबर रोजी चारठाणा येथील वैजनाथ गजमल यांच्या घरी आणि भुसार मालाच्या दुकानात छापे टाकण्यात आले. यासाठी दोन पथक तयार केले होते. दोन्ही पथकांनी एकाच वेळी टाकलेल्या छाप्यामध्ये आक्षेपार्ह नोंद असलेली नोंदवही, खरेदीखत, अवैध सावकारी संदर्भातील आक्षेपार्ह दस्तावेज आढळले आहेत. यासंदर्भात अवैध सावकारी केल्याच्या प्रकरणात संबंधितास म्हणणे सादर करण्याची संधी दिली जाणार असून, अवैध सावकारी सिद्ध झाल्यास महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ मधील तरतुदीनुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सहकार विभागाने सांगितले. जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहायक निबंधक उमेशचंद्र हुसे, कार्यालयीन अधीक्षक बी. एस. नांदापूरकर, अधीक्षक एस. व्ही. अब्दागिरे, बी.जी. पठाण, सहाय्यक निबंधक माधव यादव यांच्या नियोजनाखाली पथक प्रमुख पी. बी. राठोड, ए.जी. निकम, के. व्ही. नांदापूरकर, डी.एस. हराळ, एस.पी. बाशवेणी, ए. ए.जवळेकर, एस.बी लोणीकर, विजय देखणे आदींनी केली.