राहुल पाटील यांच्याकडून नुकसानीची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:21 IST2021-07-14T04:21:22+5:302021-07-14T04:21:22+5:30
परभणी शहरासह परिसरात रविवारी अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीने घरे तसेच शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अनुषंगाने परभणी ...

राहुल पाटील यांच्याकडून नुकसानीची पाहणी
परभणी शहरासह परिसरात रविवारी अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीने घरे तसेच शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अनुषंगाने परभणी तालुक्यातील पिंगळी, रायपूर, मिरखेल, असोला आदी गावशिवारात आमदार डॉ. राहुल पाटील यांनी सोमवारी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत तहसीलदार संजय बिरादार, मंडळ अधिकारी व्ही.एच. पकवान्ने, तलाठी श्याम आलेवार, भारत नखाते, शरद देशमुख, अंगद गरुड, भानुदास दुबे, मदन मस्के, रवी पतंगे, संदीप झाडे, बाळासाहेब डुकरे, अंकुश मस्के, बाळासाहेब गरुड, बाबू फुलपगार आदींची उपस्थिती होती. यावेळी आमदार डॉ. पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना नुकसानीबद्दल मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लवकरच मुंबईत भेट घेणार असल्याचे सांगितले. यावेळी शेतकऱ्यांनी शेतातील जनावरे तसेच शेतीउपयोगी साहित्य वाहून गेल्याचे त्यांना सांगितले.