राहुल पाटील यांच्याकडून नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:18 IST2021-01-03T04:18:54+5:302021-01-03T04:18:54+5:30

इंडियन मेडिकल असोसिएशनची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत आयएमएच्या जिल्हा अध्यक्षपदी डॉ. अनिल कान्हे, तर सचिवपदी डॉ. संजय ...

Rahul Patil felicitates new office bearers | राहुल पाटील यांच्याकडून नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

राहुल पाटील यांच्याकडून नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

इंडियन मेडिकल असोसिएशनची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत आयएमएच्या जिल्हा अध्यक्षपदी डॉ. अनिल कान्हे, तर सचिवपदी डॉ. संजय खिल्लारे यांची सर्वानुमते निवड झाली. आ. डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक प्रशास ठाकूर, अरविंद देशमुख, नगरसेवक महेमूद खान, गंगाखेड येथील सभापती बाळासाहेब राखे, गणेश मुळे, गफूर काजी, सय्यद शफी, रहमान खान, दिलीप ताडकळसकर, शिवाजी चोपडे, बाबू फुलपगार आदींची उपस्थिती होती. नूतन पदाधिकाऱ्यांनी सामान्य व गरजवंत नागरिकांना योग्य ती आरोग्यसेवा तात्काळ द्यावी, त्यासोबत आरोग्यसेवेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, अशी अपेक्षा आ. डॉ. पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. बाळासाहेब राखे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास शिवसैनिक, आयएमएचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Rahul Patil felicitates new office bearers