ग्रामीण भागात सव्वा लाख कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:16 IST2021-05-15T04:16:39+5:302021-05-15T04:16:39+5:30
कोरोनाच्या पहिल्या लाटेत ग्रामीण भागाने रोखले असले तरी दुसऱ्या लाटेत मात्र शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. ...

ग्रामीण भागात सव्वा लाख कोरोना चाचणी
कोरोनाच्या पहिल्या लाटेत ग्रामीण भागाने रोखले असले तरी दुसऱ्या लाटेत मात्र शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. सद्य:स्थितीत ८४८ गावांपैकी ६७७ गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे सतर्क झालेल्या आरोग्य विभागाने ९ मेपर्यंत १ लाख १४ हजार ३१८ नागरिकांच्या कोरोना चाचण्या केल्या आहेत. यामध्ये ७७ हजार १४० आरटीपीसीआर तर ३७ हजार ११८ रॅपिड टेस्ट केल्या. त्यामध्ये १२ हजार ९५० रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये ८ हजार २३६ पुरुषांची, तर ४ हजार ७१४ महिलांची संख्या आहे. आतापर्यंत ९ हजार १२२ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. असे असले तरी ग्रामीण भागात जिल्हा आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून कोरोनाने चांगलेच पाय पसरले असल्याचे दिसून येते.