एटीएमधारकाच्या खात्यावरील सव्वा लाख पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:03 IST2021-02-05T06:03:24+5:302021-02-05T06:03:24+5:30

एटीएम केंद्रावर पैसे काढत असताना तुमचे पैसे काढून देतो, असे सांगत एटीएम कार्डाची अदलाबदल करत पासवर्ड हस्तांतरित करून खात्यावरील ...

A quarter of a lakh was stolen from the ATM holder's account | एटीएमधारकाच्या खात्यावरील सव्वा लाख पळविले

एटीएमधारकाच्या खात्यावरील सव्वा लाख पळविले

एटीएम केंद्रावर पैसे काढत असताना तुमचे पैसे काढून देतो, असे सांगत एटीएम कार्डाची अदलाबदल करत पासवर्ड हस्तांतरित करून खात्यावरील पैसे पळविल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. पैसे पळविणाऱ्या हाय प्रोफाइल भामट्यांनी ७ डिसेंबर २०१९ रोजी शहरातील एका युवकाकडील एटीएम कार्डवरील काही क्रमांक हस्तगत करून एटीएम कार्डाचे क्लोन तयार करून महिलेच्या खात्यावरील ४० हजार रुपये पळविल्याची घटना घडली होती. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. याच गुन्ह्याची पुनरावृत्ती करत हाय प्रोफाइल भामट्यांनी ९ डिसेंबर २०२० रोजी गंगाखेड शहरात बहिणीला भेटण्यासाठी आलेले अशोक रामभाऊ कांदे (वय ४५ रा. जिरेवाडी, ता. परळी, हल्ली मुक्काम चिखली, पुणे) यांना पैशाचे काम पडल्याने त्यांनी शहरातील डॉक्टर लेनजवळील एसबीआय बँकेच्या एटीएम केंद्रावरून ५ हजार रुपये काढले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १० डिसेंबर रोजी ते परत पुण्याला निघून गेले. एटीएम केंद्रावर पैसे काढण्यासाठी आलेल्या अशोक रामभाऊ कांदे यांच्या एटीएम कार्डाची माहिती अवगत करून काही भामट्यांनी एटीएम कार्डाचे क्लोन तयार करून ११, १२ व १३ डिसेंबर व १५ डिसेंबर २०२० दरम्यान सलग ४ वेळा ३० हजार रुपये काढून खात्यावरील १ लाख २० हजार रुपये लंपास केले. खात्यावरून पैसे काढल्याचा संदेश प्राप्त झाल्याने अशोक रामभाऊ कांदे यांनी पुणे येथील बँकेत जाऊन चौकशी केली. तेव्हा त्यांच्या खात्यावरील १ लाख २० हजार रुपये कमी झाल्याची माहिती समोर आली. गंगाखेड येथील एटीएम केंद्रावरून पैसे काढल्यानंतर हा प्रकार सुरू झाल्याने अशोक रामभाऊ कांदे २७ जानेवारी रोजी गंगाखेड येथे येऊन पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात भामट्यांविरुद्ध फसवणुकीच्या गुन्ह्यासह माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर या करीत आहेत.

Web Title: A quarter of a lakh was stolen from the ATM holder's account