४७ हजार क्विंटल कापसाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:42 IST2021-01-13T04:42:51+5:302021-01-13T04:42:51+5:30

सोनपेठ तालुक्यात दरवर्षी कापसाची पेरणी मोठ्या प्रमाणात करण्यात येते. यावर्षीही तालुक्‍यात १७ हजार ४८ हेक्टरवर कापसाचा पेरा करण्यात ...

Purchase of 47,000 quintals of cotton | ४७ हजार क्विंटल कापसाची खरेदी

४७ हजार क्विंटल कापसाची खरेदी

सोनपेठ तालुक्यात दरवर्षी कापसाची पेरणी मोठ्या प्रमाणात करण्यात येते. यावर्षीही तालुक्‍यात १७ हजार ४८ हेक्टरवर कापसाचा पेरा करण्यात आला आहे. शासनाने कापसाचा ५ हजार ८०० रुपये हमीभाव जाहीर केलेला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती व सीसीआय, फेडरेशनकडून तालुक्यात कापसाच्या खरेदीसाठी ३ जिनिंगमध्ये खरेदी करण्यात येत आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कापसाला ५ हजार ७२५ रुपये एवढा उच्चांकी दर मिळत आहे. यामुळे आतापर्यंत ४७ हजार ६५१ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. आतापर्यंत १५५६ शेतकऱ्यांचा ४७ हजार ६५१ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आलेले आहे. दरम्यान, ७ हजार ६८८ शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यापैकी १ हजार ७०० शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यात आले आहेत.

Web Title: Purchase of 47,000 quintals of cotton